रत्नागिरी : जिथे गळतीमुळे धरणांना धोका उद्भवू शकतो, अशा धरणांमधील पाणी कालव्यांमधून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या धरणांची तत्काळ पाहणी करून हा निर्णय घेतला जाईल. त्यासाठी लोकांना कल्पना देऊनच या हालचाली केल्या जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकमतला दिली.
त्यामुळे आता जी धरणे धोकादायक ठरण्याची शक्यता आहे, अशा धरणांमधील पाणी सोडले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांची डॅम सेफ्टी ऑर्गनायझेशन असते. जिल्ह्यातील सर्व धरणांची पाहणी करण्याची सूचना या समितीला देण्यात आली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.धोकादायक ठिकाणचे पुनर्वसनजिथे जिथे धरण क्षेत्रात लोकवस्ती आहे आणि जिला धोका होऊ शकतो, अशा ठिकाणच्या लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यावरही भर दिला जाईल. मुळात त्यांच्या काही अडचणी आहेत का? त्यांना पुनर्वसनासाठी जागा देऊन झाली आहे का, हे तपासून लोकांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले.