प्राथमिक शिक्षक संघाच्या मागणीनंतर बीडीएस प्रणाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST2021-08-21T04:36:19+5:302021-08-21T04:36:19+5:30
दापोली : फेब्रुवारीपासून अनियमित आणि बहुतांश काळ बंद असलेली बीडीएस प्रणाली लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा ...

प्राथमिक शिक्षक संघाच्या मागणीनंतर बीडीएस प्रणाली सुरू
दापोली : फेब्रुवारीपासून अनियमित आणि बहुतांश काळ बंद असलेली बीडीएस प्रणाली लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने केली हाेती. या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ही बीडीएस प्रणाली सुरू करण्यात आल्याने संघाने समाधान व्यक्त केले आहे.
बीडीएस प्रणाली सुरू करण्याबाबत संघाने आमदार शेखर निकम यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली होती. या मागणीनंतर या भेटीवेळी एका महिनाभरात ही प्रणाली सुरू करतो, असे आश्वासन रत्नागिरी शिक्षक संघाला आमदार शेखर निकम यांच्यासमक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हाेते. हा दिलेला शब्द पाळत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही प्रणाली दिनांक १८ ऑगस्ट २०२१ रोजी सुरू करून आपला शब्द पूर्ण केल्याचे शिक्षक संघाने सांगितले आहे. ही प्रणाली सुरू झाल्याने अनेक शिक्षकांचे निवृत्ती वेतन व भविष्य निर्वाह निधीची रक्कम प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे संघातर्फे सांगण्यात आले.
बीडीएस प्रणाली सुरू केल्याबद्दल जिल्हा अध्यक्ष संतोष कदम, जिल्हा सरचिटणीस संदीप जालगावकर यांनी समाधान व्यक्त केले. या भेटीवेळी अमित सुर्वे, सतीश सावर्डेकर, मनोज घाग उपस्थित हाेते.