पोसरे येथे लसीकरणाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:32 IST2021-04-20T04:32:32+5:302021-04-20T04:32:32+5:30

अडरे : आराेग्य केंद्रापासून दूर असणाऱ्या गावांतील लाेकांना लस घेण्यासाठी जिकरीचे हाेत आहे. ही गैरसाेय लक्षात घेऊन चिपळूण तालुक्यातील ...

Launch of vaccination at Posare | पोसरे येथे लसीकरणाचा शुभारंभ

पोसरे येथे लसीकरणाचा शुभारंभ

अडरे : आराेग्य केंद्रापासून दूर असणाऱ्या गावांतील लाेकांना लस घेण्यासाठी जिकरीचे हाेत आहे. ही गैरसाेय लक्षात घेऊन चिपळूण तालुक्यातील पाेसरे येथील उपआराेग्य केंद्रात लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्य अरविंद चव्हाण यांच्या उपस्थितीत या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.

रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावे आरोग्य केंद्रापासून खूप दूरवर असल्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना या आरोग्य केंद्रापर्यंत येणे जिकरीचे होते. ग्रामस्थांची हाेणारी गैरसाेय लक्षात घेऊन ही लस आराेग्य केंद्रांच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांतर्फे शिवसेना विभागप्रमुख संताेष उतेकर यांनी जिल्हा परिषद सदस्य अरविंद चव्हाण यांच्याकडे केली हाेती. त्याची दखल घेत प्राथमिक तत्त्वावर पाेसरे उपआराेग्य केंद्रात लसीचे ८० डोस उपलब्ध करून दिले आहेत. जिल्हा परिषद सदस्य अरविंद चव्हाण, आरोग्य विभागातील अधिकारी, शिवसेना पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत साेमवारी या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी गुहागर प्रवक्ते संजय रेवणे, पोसरे गावचे सरपंच साजिदा सलीम केरकर, पंधरा गावचे अध्यक्ष यशवंत म्हापदी, पोलीस पाटील समीर म्हापदी, माजी सरपंच आनंद साळवी, संदीप म्हापदी, शिवसेना उपविभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण, प्रवीण सावंत, शाखाप्रमुख भगवान महाराज म्हापदी, कृष्णा जाधव उपस्थित होते.

Web Title: Launch of vaccination at Posare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.