लांजा तालुक्यात शिवसंपर्क अभियानाची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:22 IST2021-07-16T04:22:53+5:302021-07-16T04:22:53+5:30

लांजा : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या शिवसंपर्क अभियानाची सुरुवात गुरुवारी लांजा तालुक्यात जिल्हा संपर्कप्रमुख ...

Launch of Shiv Sampark Abhiyan in Lanja taluka | लांजा तालुक्यात शिवसंपर्क अभियानाची सुरुवात

लांजा तालुक्यात शिवसंपर्क अभियानाची सुरुवात

लांजा : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या शिवसंपर्क अभियानाची सुरुवात गुरुवारी लांजा तालुक्यात जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे व जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

लांजा तालुक्यातील भांबेड, प्रभानवल्ली पंचायत समिती गणांमध्ये शिवसंपर्क अभियानांतर्गत लोकांशी संपर्क वाढवणे तसेच गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारचे काम व धोरणे जनतेपर्यंत पोहोचविणे हे आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा संगमेश्वरचे सभापती जयसिंग माने, तालुकाप्रमुख संदीप दळवी, उपतालुकाप्रमुख दिलीप पळसुलेदेसाई, सभापती मानसी आंबेकर, उपसभापती दीपाली दळवी-साळवी, विभागप्रमुख युवराज हांदे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, उपविभागप्रमुख, सरपंच, शाखाप्रमुख, युवा सेना, महिला आघाडी, सहकार संघटना, वाहतूक सेना यांचे सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

-----------------------------

लांजा तालुक्यातील शिवसंपर्क अभियानाच्या शुभारंभावेळी जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर माेरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Web Title: Launch of Shiv Sampark Abhiyan in Lanja taluka