भाेवडे येथे ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ अभियानाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:51 IST2021-05-05T04:51:43+5:302021-05-05T04:51:43+5:30

देवरुख : कोविड-१९ चा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत असून, प्रत्येक गावा-गावांमध्ये कोविड-१९बाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ ...

Launch of 'My Ratnagiri, My Responsibility' campaign at Bhavade | भाेवडे येथे ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ अभियानाचा शुभारंभ

भाेवडे येथे ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ अभियानाचा शुभारंभ

देवरुख : कोविड-१९ चा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत असून, प्रत्येक गावा-गावांमध्ये कोविड-१९बाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे जिल्हा परिषद गटातील भोवडे ग्रामपंचायतीमधून अभियानाचा शुभारंभ संगमेश्वर तालुका पंचायत समिती सभापती जयसिंग माने यांच्या उपस्थितीत मंगळवारी करण्यात आला.

यावेळी उपसरपंच प्रशांत अडबल, ग्रामपंचायत सदस्य, साखरप्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. बी. अदाटे, आरोग्य सेविका, आशा सेविका, इतर नागरिक उपस्थित होते. या मोहिमेअंतर्गत गावातील सर्व घरांमधून जाऊन तेथे घरातील सदस्यांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. तसेच या मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभेल, असा विश्वास सभापती जयसिंग माने यांनी व्यक्त केला आहे. तसेच ही मोहीम संपूर्ण तालुक्यात उत्तमरित्या राबविली जाईल याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

.....................................

संगमेश्वर तालुक्यातील दाभाेळे जिल्हा परिषद गटातील भाेवडे येथे ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंचायत समिती भासपती जयसिंग माने उपस्थित हाेते.

Web Title: Launch of 'My Ratnagiri, My Responsibility' campaign at Bhavade