विकास कामांचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:33 IST2021-03-23T04:33:07+5:302021-03-23T04:33:07+5:30
कर्देत ए. जी.च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन दापोली : दापोली येथील ए. जी. हायस्कूलच्या १९९६ एसएससी बॅचचे दोन दिवसांचे स्नेहसंमेलन ...

विकास कामांचा शुभारंभ
कर्देत ए. जी.च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
दापोली : दापोली येथील ए. जी. हायस्कूलच्या १९९६ एसएससी बॅचचे दोन दिवसांचे स्नेहसंमेलन कर्दे येथे पार पडले. पहिल्या दिवशी स्नेहसंमेलनात दापोली, चिपळूण, पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, अहमदाबाद तसेच परदेशी राहणारे सदस्य उपस्थित होते.
वीज कनेक्शन तोडले
गुहागर : गुहागर वीज महावितरण विभागाकडून वीजबिल थकबाकी वसुली मोहीम जोरदारपणे सुरू आहे. तालुक्यात ८२५१ ग्राहकांची २ कोटी ७५ लाख ७९ हजाराची थकबाकी आहे. महावितरणकडून थकीत ७६६ ग्राहकांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला असून यातील १५० ग्राहकांनी थकबाकी भरली आहे. गुहागर महावितरण उपकार्यकारी अभियंता गणेश गलांडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवली जात आहे.
तालुकाध्यक्षपदी मंगेश शिंदे
दापोली : रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्या आदेशानुसार दापोली तालुका नाभिक समाज कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी मंगेश शिंदे, सचिव शैलेश चव्हाण, खजिनदारपदी प्रीतम शिंदे, तर उपाध्यक्षपदी तालुक्यातील एकूण सात गटांचे अध्यक्ष व जिल्हा कमिटीवर सदस्य म्हणून योगेश दळवी, उदय शिंदे, शेखर कदम, राजेंद्र यादव, अमित कदम, अमोल पवार, रमाकांत शिंदे, विजय बागकर व सल्लागार म्हणून मारुती चव्हाण, संतोष शिंदे, सुरेश यादव, रमेश इंदुलकर, शैलेश कदम, अनिल पवार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
विकासकामे मंजूर
खेड : तालुक्यातील आष्टी गावच्या १९ लाखांच्या विकास कामांना आमदार भास्कर जाधव यांच्या माध्यमातून आणि शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी वहाब सैन यांच्या प्रयत्नाने मंजुरी मिळाली आहे. यामध्ये आष्टी शंकर मंदिर ते बस थांबा रस्ता मजबुतीकरण- १० लाख, एस.टी. बस थांबा ते कब्रस्तान रस्ता मजबुतीकरण ४ लाख आणि अन्य ५ लाख खर्चाच्या विकास कामांचा समावेश आहे.
चिपळुणात विनामास्क फिरणाऱ्या २०४ जणांवर कारवाई
चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमी नगरपरिषदेसह पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडाची कारवाई सुरू केली होती. आता ही कारवाई पोलीस करणार असून, पोलिसांची बारीक नजर राहणार आहे. आतापर्यंत विनामास्क फिरणाऱ्यांना ५०० रुपये दंड होता. आता नवीन निर्देशानुसार हा दंड कमी करून ३०० रुपये करण्यात आला आहे. आतापर्यंत नगरपरिषदेने ३० हजार, तर पोलिसांनी ७२ हजार रुपये असा एकूण एक लाख दोन हजार रुपये दंड आकारला आहे.
दहिवली गावाची २९ रोजीची यात्रा रद्द
चिपळूण : तालुक्यातील दहिवली बुद्रुक व दहिवली खुर्द या दोन्ही गावांच्या पालखी भेटीनिमित्त २९ मार्च रोजी होणारी यात्रा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. याबाबत ग्रामस्थांनी बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. कोरोना पार्श्वभूमीवर शासनाचे नियम व सूचनांचे पालन करून पारंपरिक पध्दतीने केवळ ५० ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा पालखी भेट सोहळा पार पडणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान
आबलोली : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील श्री विठ्ठल - रखुमाई प्रासादिक भजन मंडळातर्फे वाडीतील विविध क्षेत्रात कार्यरत असणारे ज्येष्ठ नागरिक, महिलांना भेटवस्तू व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महिलांच्या दोन गटात विविध स्पर्धा पार पडल्या. बक्षीस वितरण कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष रमेश नेटके, उपाध्यक्ष प्रवीण भंडारी, सचिव दिनेश नेटके, सहसचिव राजू गुरसळे, महेश दिंडे, संदीप निमुणकर, महेश रेडेकर, प्रमोद नेटके, अजित रेपाळ, जनार्दन रेपाळ, अक्षय रेपाळ, अजिंक्य नेटके, सत्यम गुरसळे, राजवी बाईत, सुप्रिया उकार्डे, कल्याणी नेटके, किमया नेटके उपस्थित होते.
गुहागर तेली समाजोन्नती संघाचे संमेलन
आबलोली : चिपळूण व गुहागर तेली समाजोन्नती संघातर्फे शतकमहोत्सवी महाशिवरात्री संमेलन व शिवपिंडी पूजन कार्यक्रम लालबाग - मुंबई येथे पार पडला. यावेळी संघाचे अध्यक्ष वसंत पवार, सचिव प्रमोद महाडिक, कार्याध्यक्ष जयवंत रसाळ, सल्लागार अशोक रहाटे, उपाध्यक्ष नितीन लांजेकर, प्रवीण रहाटे, सहकार्याध्यक्ष नरेंद्र झगडे, सहसचिव गणेश रहाटे उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण जयंती
गुहागर : पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात प्राचार्य डॉ. आर. जी. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पाटपन्हाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर हिरवे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. जालिंदर जाधव, प्रा. प्रमोद देसाई, प्रा. प्रसाद भागवत, डॉ. प्रवीण सनये, डॉ. दिनेश पारखे, डॉ. सुभाष खोत, डॉ. कृष्णाजी शिंदे, प्रा. लंकेश गजभिये उपस्थित होते.
विविध स्पर्धांमध्ये यश
चिपळूण : येथील टीब्ल्यूजी कंपनीतर्फे ‘अवयव दान’ या विषयावर आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेस उत्तम प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत गुहागर तालुक्यातील आरे येथील ओम देवकर व पोस्टर स्पर्धेत कुडाळ तालुक्यातील बिबवणे येथील राम बिबवणेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच पोस्टर स्पर्धेत स्नेहा कानिटकर (इचलकरंजी) दि्वतीय, वैष्णवी लाहिम (चिपळूण) तृतीय, तर अवनी पांचाळ (विरार), सायली पालांडे (गुहागर), शुभम वाडये (रामेश्वर, देवगड) व मैविश चिपळूणकर (पाली, चिपळूण) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले. वक्तृत्व स्पर्धेत स्नेहा कानिटकर (इचलकरंजी) दि्वतीय, रुद्र पालकर (टिटवाळा) तृतीय, तर रोहिणी कोठावरे (मुंबई), ओंकार साळुंखे (सांगुळवाडी, वैभववाडी), अजय अंधारे (जालना) व रेवती करादगे (चिपळूण) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले.