शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

लोटेत कंपनी व्यवस्थापकाची आत्महत्या-कंपनी आवारातच गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 18:06 IST

लोटे - परशुराम, ता. खेड औद्योगिक वसाहतीतील दिपचंद केमिकल्स प्रा. लि. या कंपनीच्या व्यवस्थापकाने कंपनी आवारातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे

आवाशी : लोटे - परशुराम, ता. खेड औद्योगिक वसाहतीतील दिपचंद केमिकल्स प्रा. लि. या कंपनीच्या व्यवस्थापकाने कंपनी आवारातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता निदर्शनास आली. संदीप संताराम पांडे (३०, पिरलोटे) असे त्या व्यवस्थापकाचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळ व लोटे पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत व्यवस्थापक पांडे व त्याचे कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून याच कंपनी आवारात घरवजा झोपडी करुन राहत होते. संदीप पांडे हे लोटे परिसरात जन्मापासून राहत असून हे कुटुंब मूळ उत्तर प्रदेश येथील आहे. त्यांचे वडील व ते दिपचंद कंपनीत एकत्र काम करतात. काही दिवसांपूर्वीपासून ते सध्या पिरलोटे येथील एका अपार्टमेंटमध्ये एकत्र कुटुंबात राहतात. मयत व्यवस्थापक हे विवाहीत असून त्यांना दोन मुले आहेत.

आज सकाळी संदीप पांडे व त्यांचे वडील हे दोघे एकत्र कंपनीत आले. या कंपनीत एकूण चार कामगार काम करीत आहेत. सकाळच्या सत्रात नेहमीप्रमाणे येणारा कामगारांसाठीचा चहा आला असता तो घेण्यासाठी संदीप हे कोठे आहेत याची एकमेकाला विचारणा सुरु झाली. याचवेळी अधिक शोधाशोध केली असता त्याचे वडील पूर्वी ज्या झोपडीवजा घरामध्ये रहायचे, त्या डावीकडील खोलीत संदीप यांनी गळफास घेतल्याचे नजरेस आले.याची माहिती लोटे पोलीसांना देऊन त्यांना प्रथम परशुराम रुग्णालयात दाखल केले असता त्याला मयत घोषीत करण्यात आले. उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृत्यूदेह कळंबणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDeathमृत्यू