शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोटेतील केन कंपनीला आग, कोट्यवधींची हानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 20:20 IST

कंपनीचा संपूर्ण प्लँट बेचिराख झाला असून, गोदामात विक्रीसाठी तयार असणारा मालही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जवळपास अंदाजे दीड कोटींहुन अधिक वित्तहानी झाल्याचे वर्तविण्यात येत आहे.

आवाशी : खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील केन केमिकल प्रा. लि. या कंपनीला शनिवारी सकाळी अकरा वाजता लागलेल्या आगीत कंपनीचा संपूर्ण प्लँट बेचिराख झाला असून, गोदामात विक्रीसाठी तयार असणारा मालही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जवळपास अंदाजे दीड कोटींहुन अधिक वित्तहानी झाल्याचे वर्तविण्यात येत आहे.

कंपनीचे मालक कुंदन मोरे (रा. खेड) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळच्या सत्रात कंपनीची उत्पादन प्रक्रिया सुरु होती. अकरा वाजण्याच्या दरम्यान त्यांचा तयार माल साठवून ठेवणाºया गोडाऊनच्या चौथ्या मजल्यावरील एका रिकाम्या ड्रमला किरकोळ आग लागली. बहुधा इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटने ती लागली असावी असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. ही आग किरकोळ स्वरुपाची होती. कंपनीतील अग्निशमन यंत्राच्या सहाय्याने ती विझविण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र आगीपर्यंत यंत्रणा पोहचण्यात अडचणी येत होत्या. म्हणून त्यांनी त्यांच्या कंपनीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला बोलावण्यासाठी कंपनीतूनच धावत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मोरे यावेळी दोनदा धावता धावता तोल जाऊन पडले. त्यामुळे कंपनीतील एका कर्मचाऱ्याने अग्निशमन केंद्र गाठून आगीची माहिती दिली.

अग्निशमन यंत्रणा दाखल होईपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले. आग सर्वत्र पसरली गेली आणि यामध्ये त्यांच्या गोडावूनमधील तयार माल (ड्रम - बॅग्ज) आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. प्लॅन्टच्या छतावरील पत्रे, पाईप इतर साहित्यही पूर्णपणे जळाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMIDCएमआयडीसीfireआग