अखेर घडलंच...

By Admin | Updated: October 30, 2015 23:25 IST2015-10-30T22:33:31+5:302015-10-30T23:25:34+5:30

आणखी एक मासा लाचलुचपतच्या जाळ्यात

Last time ... | अखेर घडलंच...

अखेर घडलंच...

ज्योतिप्रसाद सावंत -आजरा--शासकीय कामे करून घ्यायची म्हणजे संबंधित कर्मचारी अथवा अधिकारी यांच्या उपकाराखाली राहायचे, अशीच कांहीशी भावना सर्वसामान्य नागरिकांकडून होत असल्याने ‘खुशाली’च्या नावाखाली पदाचा गैरवापर करीत राजरोजपणे लुटण्याचा अतिरेक झाला की, लाचलुचपतच्या जाळ्यात अडकण्यात फारसा वेळ लागत नाही, हे आजरा येथील नुकत्याच झालेल्या भूमी अभिलेखमधील प्रकरणाने अधोरेखित झाले आहे.
वास्तविक महसूल विभाग अशा प्रकरणात आघाडीवर असता; परंतु महसूलबरोबर पोलीस, पोलीसपाटील, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, वनविभाग येथेही असे प्रकार घडले आहेत. इतरत्रही घडतच असतात; पण आजरेकरांनी आक्रमक भूमिका घेत संबंधितांचा यातून मुजोरपणा वाढतो. भरमसाठ मागण्या होऊ लागतात. सहनशीलता संपली की, मग शेवटचा आधार लाचलुचपत खाते राहते. सोमवार ते गुरुवार याच कामात वाडकर गुंतलेला असायचा. शुक्रवारी मुख्य अधिकारी आले की, सहीसाठी कागद सरकवायचे आणि अधिकाऱ्यांच्या नावावार पक्षकारांकडून वसुली करण्याची हा प्रकार अखेर महागात पडला आहे. यामुळे आणखी एक खाते बदनाम झाले आहे हे नक्की.
याचा परिणाम म्हणजे कामांसाठी पक्षकारांना खेटे मारावे लागतात. ‘स्थावर’ लाखोंचे व्यवहार
अडकून राहिल्याने चकरा मारून वैतागलेला ‘सामान्य’ माणूस काहीतरी घ्या; पण काम करून द्या, असे साधे गणित संबंधित कर्मचाऱ्यांसमोर ठेवतो आणि आपण पगारी कर्मचारी
आहोत याचे भान विसरून
खुशालीचे गोंडस नाव पुढे करून दिल्या जाणाऱ्या रकमा हक्काच्या समजल्या जातात.


तक्रारींचा पाऊस
आजरा तालुक्यात शासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी यांच्याबाबत ‘लाचलुचपत’कडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल होत आहेत. यावरून लोकप्रतिनिधींचा शासकीय विभागावर अंकुश राहिला नाही, असेच म्हणावे लागेल. भूमी अभिलेखची तर तऱ्हाच वेगळी आहे. मुळातच या विभागात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. तालुका भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना एकाचवेळी वेगवेगळ्या तालुक्याची जबाबदारी दिल्याने हाताखालील कर्मचारी कारभाराचा गाडा हाकताना दिसतात. प्रॉपर्टी कार्ड, नकाशे तयार करणे, मोजणीची कामे, न्यायालयीन तारखांना हजर राहणे हे अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे शक्य होत नाही.

Web Title: Last time ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.