गत निवडणुकीतही ‘ती’च आघाडीवर
By Admin | Updated: September 18, 2014 23:23 IST2014-09-18T22:24:49+5:302014-09-18T23:23:07+5:30
सन २००९ साली झालेल्या विधानसभेच्या एकूण मतदारांची संख्या, झालेले एकूण मतदान, पुरूष आणि स्त्रियांची संख्या

गत निवडणुकीतही ‘ती’च आघाडीवर
रत्नागिरी : सन २००९च्या निवडणुकीतही झालेल्या मतदानात महिलांनी पाचही विधानसभा मतदार संघात आघाडी घेतली होती, हे विशेष. यावेळी झालेल्या मतदानात पुरूषांपेक्षा महिला मतदारांची संख्या चक्क ७३,९३० ने अधिक होती.
सन २००९ साली झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातील २६३ - दापोलीत एकूण मतदारांची संख्या २ लाख ३८ हजार ७९५, २६३ - गुहागरमध्ये २ लाख ४ हजार ६५५, २६५ - चिपळूणमध्ये २ लाख २४ हजार ६९४, २६६ - रत्नागिरीमध्ये २ लाख ३७ हजार २०६ आणि २६७ - राजापूरमध्ये २ लाख ११ हजार १५८ अशी एकूण होती. यावेळी एकूण मतदारांची संख्या ११ लाख १६ हजार ५०८ इतकी होती. यापैकी ७ लाख ३१ हजार ५७६ इतके मतदान झाले.
यामध्ये पुरूष मतदारांची संख्या ३ लाख २९ हजार ३२३ होती, तर महिला मतदारांची संख्या ४ लाख ३ हजार २५३ इतकी होती. म्हणजेच महिलांची संख्या पुरूषांपेक्षा तब्बल ७३,९३० ने अधिक होती. यावर्षीही मतदानाचा हक्क बजावणाऱ्या महिलांची संख्या पुरूषांपेक्षा ६२,०७८ ने अधिक आहे.
सन २००९मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावलेल्या महिलांची संख्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक होती. आता या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणाऱ्या महिलांची संख्या दापोलीत सर्वाधिक आहे.
अर्थात, महिला मतदारांची संख्या अधिक असली तरी आजवरचे महिला आमदारांचे प्रमाण मात्र नगण्यच आहे. रत्नागिरीतून कुसुमताई अभ्यंकर आणि संगमेश्वरमधून लक्ष्मीबाई तथा मामी भुवड या दोनच महिला आतापर्यंत आमदार झाल्या आहेत. त्याही कोणत्याही आरक्षणाशिवाय. इतरवेळी कोठेही महिला उमेदवारांना संधी मिळालेली नाही. (प्रतिनिधी)
सन २००९ साली झालेल्या विधानसभेच्या एकूण मतदारांची संख्या, झालेले एकूण मतदान, पुरूष आणि स्त्रियांची संख्या
(विधानसभा मतदार संघनिहाय)
मतदारसंघएकूणएकूण मतदान
मतदारमतदानपुरूष स्त्रीटक्के
दापोली२,३८,७९५१,४०,२९०६०,७६६७९,५२४५८.७५
गुहागर२,0४,६५५१,४०,६६०५९,७४१८१,९१९६९.२२
चिपळूण२,२४,६९४१,५१,३६०७१,५१५७९,७९२६७.३४
रत्नागिरी२,३७,२0६१,५९,२५९७५,७१५८४,५४४६७.१४
राजापूर२,११,१५८१,३९०६०६१,५८६७७,४७४६५.८६
एकूण११,१६,५०८७,३१,५७६३,२९,३२३४,०३,२५३६५.५२