शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत उभारणार राज्यातील सगळ्यात मोठी प्रशासकीय इमारत, मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 15:39 IST

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत असावी आणि जिल्हाभरातून याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची वणवण कमी व्हावी यादृष्टीने ही इमारत बांधण्यात येणार आहे.

रत्नागिरी : शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात राज्यातील सर्वात मोठी ९ मजली प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. या इमारतीसाठी ४० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, अर्थसंकल्पात २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, टोकन म्हणून ही रक्कम दिल्याचेही त्यांनी सांगितले.मंत्री उदय सामंत जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत असावी आणि जिल्हाभरातून याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची वणवण कमी व्हावी यादृष्टीने ही इमारत बांधण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जुन्या व जीर्ण झालेल्या इमारती पाडून याठिकाणी पुण्याच्या धर्तीवर १ लाख ५० हजार चौरस फुटांची ९ मजली ही इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीत ५० शासकीय कार्यालये असणार आहेत, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली.या इमारतीच्या सर्वात शेवटच्या मजल्यावर ६०० आसन क्षमतेचे नाट्यगृह बांधण्यात येणार आहे. तसेच एका मजल्यावर पर्यटकांसाठी दालन असेल. रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्याबाबतची सर्व माहिती याठिकाणी मिळणार आहे. पर्यटकांना येण्यासाठी या इमारतीत स्वतंत्र मार्ग असेल, तसेच दिव्यांगांसाठीही स्वतंत्र मार्ग व व्यवस्था या इमारतीत करण्यात येणार आहे, असे सामंत यांनी सांगितले. येत्या आठ दिवसात या इमारतीच्या कामाची निविदा काढण्यात येणार आहे. सद्यस्थितीत या इमारतीसाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत