जंगली श्वापदांकडून मोठे नुकसान
By Admin | Updated: October 23, 2014 00:09 IST2014-10-22T21:12:03+5:302014-10-23T00:09:21+5:30
आचारसंहितेमुळे शेती संरक्षणासाठी दिलेल्या बंदुका शासनाकडे जमा असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

जंगली श्वापदांकडून मोठे नुकसान
चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील करजुवे परिसरात भातपीक तयार झाले असतानाच जंगली डुकरांकडून त्यांची मोठ्या प्रमाणात नासधूस होत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून, मेटाकुटीला आला आहे. संगमेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष नलावडे यांच्या सर्व्हे नं. २८८ चा ० या ठिकाणात डुकरांनी मोठ्या प्रमाणात भातशेतीची नासधूस केली आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी जंगली डुकरांचा त्रास सोसावा लागत आहे. करजुवे येथील संपूर्ण पिकाची जंगली डुकरांनी नासाडी केली. कृषी पर्यवेक्षक सारटे, कृषी सहाय्यक काते, संगमेश्वर पंचायत समितीचे उपसभापती संतोष डावल, करजुव्याचे सरपंच श्यामसुंदर माने, करजुवेचे पोलीसपाटील पडवळ, विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन प्रशांत विचारे, संगमेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती नलावडे व ग्रामस्थ उपस्थित होते. याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना डावल, नलावडे यांनी माहिती दिली. आचारसंहितेमुळे शेती संरक्षणासाठी दिलेल्या बंदुका शासनाकडे जमा असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे नाराजीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथे जंगली डुकरांनी भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. याची पाहणी करताना कृषी पर्यवेक्षक सोरटे, कृषी सहाय्यक काते, संगमेश्वर पंचायत समितीचे उपसभापती संतोष डावल, सरपंच श्यामसुंदर माने, पोलीसपाटील पडवळ, माजी सभापती सुभाष नलावडे, ग्रामपंचायत समिती सदस्य प्रशांत विचारे व ग्रामस्थांनी उपस्थित होते.