लांजा मनसे तालुकाध्यक्ष सचिन साळवी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST2021-08-22T04:34:27+5:302021-08-22T04:34:27+5:30
लांजा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लांजा तालुकाध्यक्ष सचिन ...

लांजा मनसे तालुकाध्यक्ष सचिन साळवी यांचे निधन
लांजा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लांजा तालुकाध्यक्ष सचिन साळवी (४२) यांचे शुक्रवारी पहाटे मुंबई येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.
सचिन साळवी यांनी सुरुवातीच्या काळात मठ गावचे शिवसेना शाखाप्रमुख म्हणून काम पाहिले होते. मठ पंचक्रोशीत शिवसेना वाढविण्यात त्यांचे मोठे योगदान होते. स्थानिक नेतृत्वावरील नाराजीतून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या संघटनात्मक कामाची दखल घेऊन त्यांची मनसेच्या लांजा तालुका अध्यक्षपदी निवड केली होती. मठ ग्रामपंचायतीचे उपसरपंच असताना त्यांनी काही महिने सरपंच पदाचा प्रभारी कारभार पाहिला होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, लहान मुलगा असा परिवार आहे.