शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अंजनी रेल्वे स्थानकाजवळ दरड कोसळली, कोकण रेल्वेची वाहतूक तब्बल तीन तास ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 14:10 IST

रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर दरड हटवून रेल्वे वाहतूक सुरळीत केली

खेड : तालुक्यातील अंजनी रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी (ता.१४) दुपारी दीड वाजता रेल्वे रुळावर दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर दरड हटवून रेल्वे वाहतूक सुरळीत केली.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अंजनी रेल्वे स्थानक व चिपळूण रेल्वे स्थानकादरम्यान दुपारी दीड वाजेच्या सुमारास रेल्वे रुळावर दरड कोसळली. मोठ-मोठे दगड व चिखलमिश्रित माती रुळावर आली. त्याची सूचना मिळताच मुंबईकडून आलेली मांडवी एक्स्प्रेस खेड स्थानकातच उभी करून ठेवण्यात आली आणि या रेल्वेचे इंजिन काढून घटनास्थळी पाठविण्यात आले.गेले आठ दिवस चिपळूण, खेड परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे वाशिष्ठी, जगबुडी नद्यांसह तालुक्यातील अन्य नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. गुरुवारी दुपारी सव्वा ते दीड वाजेच्या सुमारास खेड ते अंजनीच्या दरम्यान डोंगरातील दरड रुळावर आली होती.हा प्रकार लक्षात आल्यानंतर तत्काळ कोकण रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून दरड - माती बाजूला करण्याचे काम सुरू केले. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी मडगावकडे जाणारी हापा एक्स्प्रेस गाडी (क्रमांक २२९०८) कळंबणी स्थानकात तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम गाडी विन्हेरे स्थानकात आणि सावंतवाडी दिवा एक्स्प्रेस (५०१०४) चिपळूण स्थानकात थांबविण्यात आली होती.कोकण रेेल्वे प्रशासनाने रुळावर पडलेली दरड तीन तासांत हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला केला. यानंतर खेड रेल्वे स्थानकात उभी असलेली मांडवी एक्स्प्रेस संध्याकाळी साडेचार वाजता रवाना करण्यात आली.

तारेच्या जाळ्यासह दरड कोसळली

गेल्या काही वर्षांत कोकण रेल्वेने दरडग्रस्त भागात डोंगरावर तारेच्या जाळ्या लावल्या आहेत. त्यामुळे ट्रॅकवर दरडी कोसळण्याचे प्रमाण घटले आहे. गुरुवारी कोसळलेली दरड ही तारेच्या मजबूत जाळ्या तोडून ट्रॅकवर आलेली आहे. या घटनेमुळे कोकण रेल्वे प्रवाशांचे हाल झाले. मुंबईत जाण्यासाठी खेड रेल्वे स्थानकात आलेल्या काही प्रवाशांनी अखेर एसटी बस स्थानक गाठले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वेlandslidesभूस्खलन