लाेकमंच : कठाेर आणि करुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST2021-05-23T04:30:34+5:302021-05-23T04:30:34+5:30
कुणालाही फार पायपीट करावी लागणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे. अत्यावश्यक बाबी अंगणापर्यंत, आवारापर्यंत घरपोहोच मिळणे याला पर्याय नाही. ...

लाेकमंच : कठाेर आणि करुण
कुणालाही फार पायपीट करावी लागणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे. अत्यावश्यक बाबी अंगणापर्यंत, आवारापर्यंत घरपोहोच मिळणे याला पर्याय नाही. आधीच कोरोनामुळे धास्तावलेल्या समाजाला धीर आणि आनंद देणे हे माध्यमांचे काम होय.
तसेच एकूण आरोग्य आणीबाणी लक्षात घेता, समजा, रिक्षावाल्यांना काही आर्थिक मदत मिळणार असेल तर त्यातही परवाना न बघता, पण रिक्षाचालक संघटनेकडून माहिती घेऊन ती सरसकट केली तर त्यात अधिक माणुसकी आहे.
अनाथ बालकांनाही दत्तक घेतले जाते. सोसायटी संस्कृती कोकणातही आता बरीच वाढली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व आसपास सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. मात्र, तिथल्या पदाधिकाऱ्यांनी आमच्याप्रमाणे सहृदय, पण सजग राहून कारभार करावा. आज समजा एखादा पदाधिकारी क्रूरपणे वागला, तरी त्याला नंतर त्या सोसायटीतच राहायचे असते आणि कोरोना संकट तर कुणावरही कधीही आदळू शकते. म्हणूनच समंजसपणाला पर्याय नाही. आता प्रत्येकजण एकटा, अलिप्त, सिंगल आहे. कोरोना मृतांचे अंत्यसंस्कार करणाऱ्या नगरपंचायत कर्मचाऱ्यांना तर विशेष धन्यवाद द्यावे लागतील.
पोलीस अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर तर सर्वाधिक ताण आहे. तो दिसत नाही, पण नंतर वेगवेगळ्या आजारांच्या रूपात निघू शकतो. तरीही, काही ऑन ड्युटी पोलीस कर्मचारी इतक्या समजुतीने वागत असतात, एवढा संयम बाळगत असतात की, वाटते, केवळ प्रशिक्षणामुळे हे घडणार नाही, तर त्यांच्या कुटुंबाचेही चांगले संस्कार त्यांच्यावर वाढत्या वयात झालेले आहेत. त्यांच्या शिक्षकांकडेही त्याचे श्रेय जाते. रस्त्याने भटकणारा वेडासुद्धा कोरोनाचा प्रसारक ठरू शकतो. त्यालाही मास्क द्यावा लागेल. तो मास्क वापरतोय का ते बघावे लागेल. शेवटी हे ‘युद्ध’ आहे! व्हायरसवॉर. जरी शिस्त असली, तरी दयामाया हवीच!
- माधव गवाणकर, रत्नागिरी