लस नियोजनाचा अभाव, कोवॅक्सिनचे डोस पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST2021-07-01T04:22:32+5:302021-07-01T04:22:32+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला कोविशिल्डच्या पहिल्या डोसची प्रतीक्षा, तर जिल्ह्यात कोवॅक्सिनच्या दुसऱ्या डोसचा मुबलक ...

लस नियोजनाचा अभाव, कोवॅक्सिनचे डोस पडून
लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला कोविशिल्डच्या पहिल्या डोसची प्रतीक्षा, तर जिल्ह्यात कोवॅक्सिनच्या दुसऱ्या डोसचा मुबलक साठा उपलब्ध झाला आहे; परंतु दुसऱ्या डोससाठी नागरिक अजून पात्र नसल्याने लस पडूनच आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या डोससाठी अजून लोक पात्र ठरलेले नसतानाही जिल्ह्यातील ११२ लसीकरण केंद्रांवर सुमारे ६,७०० डोस उपलब्ध झाले आहेत; परंतु या सर्वच लसीकरण केंद्रांकडे लस घेण्यासाठी नागरिक फिरकलेच नाहीत. कोवॅक्सिनचा दुसरा डोस घेण्यासाठी अजून लोक पात्र झालेले नसतानाही साठा पाठवण्यात आला आहे. किती लोकांचा दुसरा डोस झाला व किती लोक दुसरा डोस घेणे बाकी आहेत, हा सगळा डाटा असतानासुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॉवक्सिनचे डोस पाठवण्यात आले. सर्वच लसीकरण केंद्रांवर हे डोस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे दोन दिवस लसीकरण मोहीम राबवूनही १० टक्के डोसही नागरिकांनी घेतले नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे डोस अजूनही शिल्लक आहेत.
दुसरीकडे कोविशिल्डचे डोस उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे त्याबाबतची विचारणा लोक करीत आहेत. कोवॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी लोक अजून पात्र नसतानाही ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत आणि कोविशिल्डला मागणी असतानाही त्याचे डोस उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे त्याच्या नियोजनाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.