संगमेश्वर तालुक्यात पावसामुळे साडेतीन लाख रुपयांची हानी

By Admin | Updated: May 14, 2014 00:33 IST2014-05-14T00:32:08+5:302014-05-14T00:33:24+5:30

देवरुख : गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे संगमेश्वर तालुक्यात सुमारे तीन लाख ६९ हजार २१८ रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ४४ घरे,

Lack of 3.5 million loss due to rain in Sangameshwar taluka | संगमेश्वर तालुक्यात पावसामुळे साडेतीन लाख रुपयांची हानी

संगमेश्वर तालुक्यात पावसामुळे साडेतीन लाख रुपयांची हानी

देवरुख : गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे संगमेश्वर तालुक्यात सुमारे तीन लाख ६९ हजार २१८ रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ४४ घरे, तीन गोठे, एक बुद्ध मंदिर, एक समाज मंदिर आणि दोन शौचालये यांचा समावेश आहे. वादळी वारे व मुसळधार झालेल्या पावसामुळे ४४ घरांचे अंशत: नुकसान झाले. त्यामध्ये तांबेडी येथील शंकर जाधव यांचे ५ हजार ९५० रुपयांचे, कल्पना कदम (दाभोळे खुर्द) यांचे ३ हजार, लक्ष्मण शिवगण यांचे ६००, मधुकर कोकरे (दाभोळे) यांचे २,५००, सरीता बांडागळे (मुरादपूर) ५८,९५०, निर्मल बांडागळे यांचे २१ हजार ७००, उज्ज्वला मोहिते (फणसवणे) १२००, सुवर्णा जाधव (ओझरे बुद्रुक) १४,३००, बाळकृष्ण कांबळे १३,६००, अशोक शेजवळ ५,५००, महादेव माईन १६,५००, वनिता शेट्ये ६,५००, बाळकृ ष्ण सुवरे ३,५००, सिताराम सालम ७,८००, राजाराम सुवरे ४,३५०, सुमित्रा जाधव ५,४००, रामचंद्र जोशी (निवेबुद्रु्रक) १,७००, शंकर राधीम (कनकाडी) २,९००, तुकाराम तांदळे १,४४०, सुनील जाधव १३,७७५, अशोक जाधव १२,५८४, प्रकाश जाधव १२,४८५, सावित्री गुरव ६००, सुरेश जाधव १ हजार, श्रीरंग जाधव १२,७००, संतोष कांबळे (पुर्येतर्फ देवळे) ९००, रामचंद्र विचारे १०,२५०, काशिराम कांबळे ९००, तारा सुर्वे ९००, मनोहर गुरव (दख्खीन) ९४०, जलाऊद्दीन फकीर (कळंबस्ते) ४,५००, सिताराम कांबळे (आंबेडखुर्द) ४,२००, जयप्रकाश जामस (भडकंबा) ३ हजार ७८०, नारायण सप्रे (मोर्डे) १० हजार ४००, धोंडू दळवी ४,०९५, मनोहर चव्हाण ३,८५०, शिवराम चव्हाण ४ हजार ४४०, दिलीप जाधव ६,३००, रामचंद्र गवळी २,१५०, यशोदा झोरे (करंबेळेतर्फ देवरुख) १० हजार ७००, शांताराम झोरे ९,५३५, जनाजी मिरगल १०,४५०, सुरेश रेवाळे (तळेकांटे) १४,००७, प्रकाश रेवाळे १४,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. अंशत: गोठ्यांमध्ये तुकाराम शेळके (कुळ्ये) ५,४००, शांताराम गीते (अंत्रवली) एक हजार, बाबू जाधव (कनकाडी) १,१००, फणसवणे येथील बौद्ध मंदीराचे ३,५७०, पुर्येतर्फे देवळे येथील समाज मंदिराचे ९०० रुपयांचे नुकसान झाले आहे. कळंबस्ते येथील केंद्रशाळा क्र. २च्या शौचालयाचे ६,२००, पुर्येतर्फ देवळे येथे झिंगू कांबळे यांच्या शौचालयाचे ६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Lack of 3.5 million loss due to rain in Sangameshwar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.