शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

कमी पटसंख्येमुळे रत्नागिरीतील १८८ शाळांना लागणार कुलुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 17:48 IST

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ० ते १० पटसंख्येच्या १८८ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करावे, असा आदेश शासनाने दिला आहे. या विषयावर झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत जोरदार चर्चा झाली़

ठळक मुद्दे१८८ शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या शाळेत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभेत जोरदार चर्चा प्राथमिक शाळांमधील शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ० ते १० पटसंख्येच्या १८८ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करावे, असा आदेश शासनाने दिला आहे. या विषयावर झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत जोरदार चर्चा झाली़सभापती नागले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली़ या सभेत जिल्ह्यातील विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा झाली़ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

या पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी विविध उपक्रम राबविले होते़ हे उपक्रम शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांच्या फायद्याचे ठरणारे आहेत़ त्यासाठी पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी राबविलेले उपक्रम जिल्हा परिषदेच्या २७०० प्राथमिक शाळांमध्ये राबवण्याबाबत चर्चा झाली़ यामध्ये हे उपक्रम राबविण्याचा एकमुखी निर्णय या सभेत घेण्यात आला़लवकरच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत़ या स्पर्धांमध्ये प्रत्येक स्तरावर खेळाडूंचा संघ निवड करण्यात येणार आहे़ त्यामुळे हरलेल्या संघातील चांगल्या खेळाडूंना यामध्ये संधी देण्यात येणार आहे.

यामध्ये केंद्र, बीट, तालुकास्तर, जिल्हास्तरावर संघाची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हावर निवड करण्यात आलेला संघ राज्यस्तरावर खेळवण्यात येणार आहे, अशा प्रकारे चांगल्या खेळाडूंची निवड करण्याचा निर्णय प्रथम घेण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला़ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात घट होत आहे़ त्यामुळे या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या १८८ प्राथमिक शाळांची पटसंख्या ० ते १० आहे.

या शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ या निर्णयावर आजच्या शिक्षण समितीच्या सभेत जोरदार चर्चा झाली़नाईलाजास्तव शासन निर्णयाची अंमलबजावणीे जिल्हा परिषदेला करावी लागणार आहे. त्यामुळे या १८८ शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या शाळेत करण्यात येणार असल्याने या शाळा बंद होणार आहेत.

जिल्हा परिषद शाळांच्या मागे कमी पटसंख्येचे असलेले शुक्लकाष्ट संपता संपेना; घटत्या पटसंख्येमुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांतील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्याची वेळ आली आहे.

समायोजन करताना नजीकच्या शाळेतच करण्यात यावे, अशी मागणी आता जिल्ह्यातील पालकांकडून होत आहे. मात्र, दुसरीकडे शाळांच्या घटत्या पटसंख्येला जबाबदार कोण? असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSchoolशाळा