शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

शिवसेनेला लागली कुणबी सेनेची हाय, विश्वनाथ पाटील यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 17:38 IST

शिवसेनेला तर या समाजाने भरभरून दिले. परंतू शिवसेना सरकारने देखील या समाजाची दखल घेतली नाही.

चिपळूण : कुणबी समाज शिवसेनेचा मुख्य गाभा असूनही या समाजाचा फायदा उठवला गेला. राज्यात शिवसेनेची आजची झालेली परिस्थिती या गरीब समाजाची लागलेली हाय आहे. शिवसेनेने नव्हे तर इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही गेल्या ३० वर्षात या समाजाचा राजकीय फायदा उठवला. आता मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्याने ओबीसी आरक्षणाला धक्का बसण्याची शक्यता आहे. तेव्हा समाजातील सर्वात मोठा वर्ग असलेल्या कुणबी समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी दोन महिने राज्यव्यापी निर्धार परिषद राबवली जाणार असल्याची माहिती कुणबीसेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.स्वतंत्र आरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या निर्धार परिषदेच्या पार्श्वभुमीवर येथे कुणबीसेना व बहुजनविकास आघाडी यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीला बहुजन विकास आघाडीचे नेते सुरेश भायजे, राजाभाऊ कातकर, दादा बैकर, डॉ. विकास पाटील, संदेश गोरिवले, संजय जाभरे आदी उपस्थीत होते.बैठकीनंतर पाटील म्हणाले की, कुणबी सेनेच्या स्थापनेपासून समाजाच्या विविध मागण्यासाठी लढा सुरू आहे. शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ हे त्याचेच फलित आहे. परंतू राज्यातील एकूण कुणबी समाजाचा विचार करता महामंडळास दिलेला ५० कोटींचा निधी अपुरा आहे. याशिवाय या महामंडळाची अत्यंत घाईघाईने रचना केली असून त्यात अनेक त्रुटी आहेत. कोकणात १९८२ पर्यंत कुणबी समाजाचे आमदार, खासदार विजयी व्हायचे. परंतू नंतर राजकीय परिस्थीती बदलत गेली.कोकणातील शेती अडचणीत आल्याने त्याचा सर्वाधिक फटका कुणबी समाजाला बसतो आहे. त्याबाबतचे गाऱ्हाणे आतापर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्याकडे कुणबी सेनेने मांडले. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अगदी कुळाचा प्रश्न देखील खितपत पडला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील दिलेला शब्द मोडला. त्यानतंरच्या सरकारने देखील या समाजाची दिशाभूल केली. शिवसेनेला तर या समाजाने भरभरून दिले. परंतू शिवसेना सरकारने देखील या समाजाची दखल घेतली नाही. समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा वापर केला. मात्र आता कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठी समाज जाणार नाही.मुंबईसह कोकण, खाणदेश, विदर्भ, मराठवाडा या प्रांतात कुणबी समाजबांधव मोठ्या संख्येने आहे. या समाजाची गणना ३७० च्यावर जाती असलेल्या ओबीसी प्रवर्गात केल्याने पुरेसा लाभ मिळत नाही. परिणामी तरूणांना बेरोजगारीचा जबर फटका बसत आहे. याविषयी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कुणबी समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आग्रही मागणी केली आहे. त्यासाठी समाजातील प्रभावी संघटना एकत्रीत आल्या असून कोकणातील बहुजन विकास समिती देखील संघटीत झाली आहे. पुढील दोन राज्यभर निर्धार परिषदा घेतल्या जाणार असून ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यापासून त्याची सुरवात केली जाईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv Senaशिवसेना