शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

रत्नागिरीला वापरून मगच मराठवाड्याला कोयना धरणाचे पाणी, पालकमंत्री उदय सामंत यांनी मांडली स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 13:42 IST

रत्नागिरी : कोयना अवजलाचा वापर कसा करावा, याबाबत पेंडसे समितीने दिलेल्या अहवालाचा तंतोतंत वापर करून मगच पाणी मराठवाड्याला दिले ...

रत्नागिरी : कोयना अवजलाचा वापर कसा करावा, याबाबत पेंडसे समितीने दिलेल्या अहवालाचा तंतोतंत वापर करून मगच पाणी मराठवाड्याला दिले जाईल, अशी भूमिका राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मांडली.रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केले. समुद्राला जाऊन मिळणारे कोयना अवजल मराठवाड्याकडे नेण्याचा विषय काही काही काळाने चर्चेत येतो. जवळपास गेली २०-२५ वर्षे कोयना अवजलावर चर्चा होत आहे. कोयनामध्ये दरवर्षी १,९११ दशलक्ष घनमीटर इतके पाणी वीजनिर्मिती केल्यानंतर वाशिष्ठी नदीत सोडण्यात येते. वाशिष्ठी नदीतून हे पाणी समुद्राला जाऊन मिळते. हे पाणी मराठवाड्याला, मुंबईला देण्यावर तसेच ते जिल्ह्यासाठी वापरण्यावर अनेकदा चर्चा झाली आहे. मात्र, अजूनही त्यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

या विषयावर मंत्री सामंत म्हणाले की, १९९९ पासून कोयना अवजलाबाबत आपण अभ्यास करीत आहोत. आमदार झाल्यानंतर २००५ मध्ये याबाबत विधान परिषदेत पिटीशन दाखल केले होते. त्याला अनुसरून पेंडसे समिती नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला. या समितीने दिलेल्या अहवालातील शिफारशींचा तंतोतंत वापर करून कोयना अवजल प्रथम रत्नागिरी जिल्ह्यासाठी वापरले जाईल आणि त्यानंतर ते मराठवाड्याला दिले जाईल.

काय होता अहवाल?-२७ सप्टेंबर २००६ रोजी या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला.-वीजनिर्मितीनंतर कसलाही उपयोग न होता समुद्राला जाऊन मिळणारे अवजल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिल्यास ११ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल आणि स्थानिक जनतेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल.-या पाण्यामुळे पर्यटनवाढीला चालना मिळेल आणि त्यातून स्वयंरोजगारही उपलब्ध होईल.-या पाण्यावर केवळ शेतीच नाही. तर लघू विद्युतनिर्मिती प्रकल्प, दूध डेअरी, फळ बागायत यालाही चालना मिळेल, असे या अहवालातून मांडण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKoyana Damकोयना धरणWaterपाणीUday Samantउदय सामंत