धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST2021-05-12T04:32:38+5:302021-05-12T04:32:38+5:30
राजापूर : तालुक्यातील जैतापूर, सागवे, नाणार, नाटे, आडिवरे, सोलगाव या भागातील नागरिकांसाठी धारतळे प्राथमिक आराेग्य केंद्रात काेविड केअर सेंटर ...

धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर
राजापूर : तालुक्यातील जैतापूर, सागवे, नाणार, नाटे, आडिवरे, सोलगाव या भागातील नागरिकांसाठी धारतळे प्राथमिक आराेग्य केंद्रात काेविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी करण्यात आली हाेती. त्यासाठी आमदार राजन साळवी यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून, केंद्राच्या नवीन इमारतीमध्ये ३५ बेडचे काेविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
राजापूर तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील काेराेनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी दाखल करेपर्यंत अनंत अडचणींचा सामना करावा लागताे. त्यामुळे वेळेवर उपचार मिळत नाहीत. तालुक्यातील जैतापूर, सागवे, नाणार, नाटे, आडिवरे, सोलगाव या भागातील नागरिकांना धारतळे प्राथमिक आराेग्य केंद्र साेयीचे आहे. मात्र, याठिकाणी काेविड केअर सेंटर नसल्याने त्यांना राजापूरमधील रायपाटण किंवा रत्नागिरीत जावे लागते. त्यामुळे धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी आमदार राजन साळवी यांच्याकडे करण्यात आली हाेती.
याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक संघमित्रा फुले - गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापूरकर यांच्या समवेत तातडीने बैठक घेऊन चर्चा केली. त्यावेळी जिल्हाधिकारी मिश्रा यांनी याबाबत आरोग्य आयुक्तांशी बोलून लवकरच निर्णय घेऊ, असे सांगितले होते. त्या अनुषंगाने धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूच्या नवीन इमारतीमध्ये ३५ बेडचे कोविड केअर सेंटर लवकरात लवकर सुरु होणार आहे. याठिकाणी डीसीएचसी सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
------------------------
राजापूर येथील धारतळे प्राथमिक आराेग्य केंद्रात काेविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत आमदार राजन साळवी यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली.