शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोसबी सरपंचांना कोकण आयुक्तांकडून दिलासा, विष्णू वाडेकर यांची निवड अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 16:45 IST

चिपळूण तालुक्यातील कोसबी ग्रामपंचायतीच्या सरपंच मीनाक्षी सावंत यांना कोकण आयुक्तांनी दिलासा दिला आहे. त्यांना पुन्हा एकदा सरपंच पदावर कायम राहण्याचे आदेश कोकण आयुक्तांनी दिले असून, विद्यमान सरपंच विष्णू बारकू वाडेकर यांची निवड अवैध ठरवली आहे.

ठळक मुद्देकोसबी सरपंचांना कोकण आयुक्तांकडून दिलासा, विष्णू वाडेकर यांची निवड अवैध मीनाक्षी सावंत यांना सरपंचपदावर राहण्याची संधी

चिपळूण : तालुक्यातील कोसबी ग्रामपंचायतीच्या सरपंच मीनाक्षी सावंत यांना कोकण आयुक्तांनी दिलासा दिला आहे. त्यांना पुन्हा एकदा सरपंच पदावर कायम राहण्याचे आदेश कोकण आयुक्तांनी दिले असून, विद्यमान सरपंच विष्णू बारकू वाडेकर यांची निवड अवैध ठरवली आहे.कोसबी ग्रामपंचायतीचे तत्कालिन सरपंच विष्णू वाडेकर यांनी निवडणुकीचा खर्च मुदतीत सादर केला नाही म्हणून जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी त्यांना ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पदासाठी अपात्र ठरवले होते. त्यामुळे सरपंचपद रिक्त झाले आणि जिल्हाधिकारी यांनी सरपंच पदाची निवडणूक घेण्याचे आदेश दिले.

त्यानुसार तहसीलदार, चिपळूण यांनी कोसबी ग्रामपंचायत सरपंच निवडणूक जाहीर केली. त्या निवडणुकीत मीनाक्षी सावंत या सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्या होत्या. सावंत या शिवसेनेच्या कार्यकर्त्या असून, त्यांचे पती मिलिंंद सावंत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत.दरम्यान, अपात्र ठरलेले विष्णू वाडेकर यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्या निकालाला आव्हान देत कोकण आयुक्तांकडे दाद मागितली होती. कोकण आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांचे आदेश रद्द करत वाडेकर यांच्या बाजूने निकाल दिला व वाडेकर यांचे सदस्यपद आणि सरपंचपददेखील कायम ठेवले.

कोकण आयुक्तांच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांनी विष्णू वाडेकर यांना पुन्हा सरपंचपदी विराजमान होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वाडेकर यांनी कोसबी ग्रामपंचायतीचा कारभार हाती घेतला होता आणि विद्यमान सरपंच सावंत यांचा काही दोष नसताना सरपंच पदावरुन पायउतार व्हायला लागले होते.आपल्यावर अन्याय झाला. आपण कायदेशीरपणे निवडणूक लढवून सरपंचपदी निवडून आलो होतो. असे कारण देत सावंत यांनी थेट कोकण आयुक्तांकडे धाव घेऊन दाद मागितली. चिपळूणचे सुपुत्र व मुंबई उच्च न्यायालयाचे प्रसिध्द अ‍ॅड. बकुल भोसले यांनी या प्रकरणात आयुक्तांसमोर युक्तिवाद केला.

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन सावंत या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. त्यांना अशा प्रकारे अवैध ठरवता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश चुकीचे आहेत. तसेच तत्कालिन सरपंच वाडेकर यांच्या अपिलावर त्यावेळी स्थगितीदेखील दिलेली नव्हती. तसेच सावंत यांना त्यांची बाजू मांडण्याचीही संधी दिलेली नाही, असा युक्तिवाद करण्यात आला.युक्तिवाद ग्राह्ययाकरिता सावंत यांच्यावतीने चिपळूणचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालयाचे प्रसिध्द अ‍ॅड. बकुल भोसले यांनी युक्तिवाद केला होता. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानत कोकण आयुक्तांनी हा निकाल दिला आहे.

टॅग्स :sarpanchसरपंचRatnagiriरत्नागिरी