यावेळेसही कोकणचा वापरच!
By Admin | Updated: July 9, 2014 00:29 IST2014-07-09T00:13:02+5:302014-07-09T00:29:36+5:30
आशेने पाहणाऱ्या कोकणवासीयांच्या पदरी निराशा

यावेळेसही कोकणचा वापरच!
रेल्वे अर्थसंकल्प : आशेने पाहणाऱ्या कोकणवासीयांच्या पदरी निराशा
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून अनेक रेल्वे धावताना दिसतात. पण, त्या रेल्वेचा कोकणसाठी किती उपयोग होतो, हा संशोधनाचा विषय आहे. कोकण रेल्वेमार्गाचा वापर करून अनेक राज्ये जोडली गेली. पण, यासाठी केवळ कोकणचा वापरच करण्यात आला आहे. मंगळवारी सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात कोकणसाठी काही विशेष असेल, असे वाटले होते. मात्र, यावेळेसही कोकणचा वापरच करण्यात आला. या मार्गावर मुंबई-गोवा हायस्पीड ट्रेन सुरु करण्याची घोषणा झाली, अशा प्रतिक्रिया जिल्हाभरातून व्यक्त होत आहेत.