शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

माकडांचा उपद्रव रोखण्यासाठी कोकण रेल्वेने काढली निविदा, विद्युतीकरणासाठी उभारलेले पोर्टल्स, मास्टर्सचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 16:43 IST

विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या प्रवासात यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यत्यय

रत्नागिरी : विद्युतीकरणासाठी उभारलेले पोर्टल्स, मास्टर्स यांना माकडांचा उपद्रव हाेऊ लागला आहे. त्यामुळे अनेकवेळा अडचणी निर्माण हाेत आहेत. माकडांचा उपद्रव रोखून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कोकण रेल्वेने ६ लाख ६२ हजार ६६३ रुपये अंदाजित खर्चाची निविदा काढली आहे.कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण करण्यात आले. कोकण रेल्वेच्या पूर्ण झालेल्या विद्युतीकरण मार्गावर विद्युत इंजिनासह गाड्यादेखील धावू लागल्या आहेत. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी ते राजापूर विभागातील ओएचई पोर्टल्स, मास्टर्स यावर माकडे चढून उड्या मारू लागली आहेत. विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या प्रवासात यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यत्यय निर्माण होऊ लागला आहे. ही माकडे रेल्वे गाड्यांवरून चालत आहेत. रेल्वेच्या ओव्हरहेड वायरमधून अतिउच्च क्षमतेचा विद्युत प्रवाह सुरू आहे.रत्नागिरी ते राजापूर या टप्प्यात माकडांचा वाढलेला उपद्रव कोकण रेल्वेसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे वाहतुकीत अडचण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माकडांमुळे रेल्वेच्या विद्युत प्रवाहात खंड पडू नये, वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी कोकण रेल्वेने निविदा प्रसिद्ध केली आहे. कोकण रेल्वेच्या माकडप्रवण भागात त्यांना रोखण्यासाठी अँटी क्लाइबिंग उपकरणे बसवावी लागणार आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वेMonkeyमाकड