शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अखेर 'रो-रो' सेवेला नांदगावात मिळणार थांबा; नाराज कोकणवासीयांच्या मागणीची रेल्वे प्रशासनाकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:00 IST

महाराष्ट्राच्या किनारी मार्गावरील प्रवाशांसाठी हे सोयीचे होणार

रत्नागिरी : अखेर कोकणातील प्रवाशांच्या नाराजीची दखल घेत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने रो रो वाहतूक सेवेसाठी कोलाड (महाराष्ट्र) आणि वेर्णा (गोवा) दरम्यान नांदगाव रोडवर अतिरिक्त थांबा जाहीर केला आहे. या सेवेमुळे प्रवासी नांदगाव रोडवर त्यांची कार चढवू शकतील किंवा उतरवू शकतील. महाराष्ट्राच्या किनारी मार्गावरील प्रवाशांसाठी हे सोयीचे होणार आहे.कोकण रेल्वेने सुरू केलेली रो रो वाहतूक सेवा कारसाठीही सुरू करण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपूर्वी घेतला होता. कोकण रेल्वेचा प्रवास सुखकारक, सोयीस्कर आणि सुलभ आणि स्वस्त असल्याने रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या रो-रोमधून कार आणण्याच्या सेवेचे स्वागत प्रवाशांनी केले.मात्र, ही सुविधा कोकणवासीयांच्या उपयोगाची नसल्याचे लवकरच निदर्शनात आले. कार चढविणे आणि उतरविणे ही सेवा कोलाड (महाराष्ट्र) आणि वेर्णा (गोवा) या दोन ठिकाणीच ठेवण्यात आली होती. त्यामुळे मधल्या भागातील प्रवाशांना ही सुविधा घेणे महागडे ठरणारे होते. याबाबत माध्यमांनीही ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.

अखेर प्रवाशांकडूनही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याने त्यांच्या मागणीवरून कोकण रेल्वे प्रशासनाने दखल घेत कोलाड आणि वेर्णा या दोन ठिकाणांदरम्यान नांदगाव रोड येथेही कारमालकांना कार चढविण्यासाठी आणि उतरविण्यासाठी थांबा देण्याचे जाहीर केले आहे.ही सेवा सुरू झाल्यानंतर कोलाड येथून दुपारी ३ वाजता ही रो रो निघणार असून, रात्री १० वाजता नांदगाव रोड येथे पोहोचेल. मध्यरात्री १२ वाजता नांदगाव येथून निघून दुसऱ्या दिवशी सकाळी व वाजता वेर्णा येथे पोहोचेल. तर वेर्णा येथून दुपारी ३ वाजता सुटणारी रो रो नांदगाव रोड येथे रात्री ८ वाजता पोहोचेल. त्यानंतर रात्री १०:३० वाजता तिथून निघून कोलाड येथे सकाळी ६ वाजता पोहोचेल, असे कोकण रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.