शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

गणेशोत्सवासाठी यंदा पाच महिने आधीच बुकिंग सुरु, कोकण रेल्वे प्रशासनाचे नियोजन; कधीपासून सुरु होणार बुकिंग...जाणून घ्या

By सुधीर राणे | Updated: April 24, 2023 16:26 IST

मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रेल्वेवर भार पडण्याची शक्यता

कणकवली : यावर्षी १९ सप्टेंबरला श्री गणेश चतुर्थी आहे. या दिवसापासून साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी येणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. यंदा रेल्वे तिकिटाचे बुकिंग १७ मे पासून आगाऊ पद्धतीने सुरू होणार आहे.कोकणात मोठ्या प्रमाणात होळीसह गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो. घरोघरी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होते. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही १९ सप्टेंबर पासून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. दीड, पाच, सात, नऊ किंवा अकरा दिवसांमध्ये साजरा होणाऱ्या या गणेशोत्सवासाठी प्रत्येक घरामध्ये मुंबई, पुणे येथून चाकरमानी येत असतात. त्यामुळे त्यांना प्रवासाचे नियोजन आगावू करावे लागते. यंदा १९ सप्टेंबरला श्री गणेश चतुर्थी असली तरी पूर्व तयारीसाठी अनेकजण गावाकडे येणार आहेत. यासाठी रेल्वेचे बुकिंगचे आतापासूनच नियोजन केले जात आहे. येत्या १७ मे पासून १४ सप्टेंबर, १८ मे रोजी १५ सप्टेंबर असे आरक्षण करता येणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी चार जूनला २ ऑक्टोबरचे बुकिंग होणार आहे. नियमित गाड्यांबरोबर जादा गाड्या यावेळी सोडल्या जातात. त्यामुळे सध्या तरी कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणाऱ्या गाड्यांसाठी १७ मे पासून गणेशोत्सवासाठी आगाऊ आरक्षण उपलब्ध होणार आहे. गौरी-गणपती उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांसाठी १२० दिवसांचे हे आगाऊ आरक्षण करावे लागणार आहे.मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण काम अद्याप पूर्ण झालेले नाही. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील या महामार्गाचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना महामार्ग प्राधिकरणला केंद्र शासनाने दिल्या आहे. हा महामार्ग वाहतुकीस योग्य झाल्यास खासगी गाड्या मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल झाल्यास रेल्वेचा भार कमी होण्याची शक्यता आहे. सध्या या महामार्गाचे काम सुरू असल्याने अनेक चाकरमानी पुणे, सातारा, कोल्हापूर ते कोकण असा प्रवास करतात. त्यामुळे काही मंडळी रेल्वेचा पर्याय निवडतात. त्यामुळे रेल्वेच्या आगाऊ आरक्षणासाठी चाकरमानी प्रयत्नशील राहणार आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गrailwayरेल्वेKonkan Railwayकोकण रेल्वेGanesh Mahotsavगणेशोत्सव