शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

कोकण रेल्वेच्या ८ गाड्या रद्द, ७ गाड्यांच्या मार्गात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 17:36 IST

मध्य रेल्वेच्या आपटा - जिते रेलमार्गावर दरड कोसळल्याने व अनेक ठिकाणी रेलमार्गावर पाणी आल्याने सोमवारी दुसऱ्या दिवशीही कोकण रेल्वेच्या सेवेवर परिणाम झाला. कोकण रेल्वेने मडगाव - मुंबई मार्गावरच्या आजच्या ८ गाड्या रद्द केल्या आहेत. तर केरळहून निझामुद्दीन, चंडीगढ, पोरबंदर, अजमेर मार्गावर धावणाऱ्या गाड्या अन्य मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत, तर चार गाड्या उशीरा धावत आहेत. सकाळी ११.४५ वाजण्याच्या दरम्याने नेत्रावती एक्स्प्रेस सोडण्यात आली. तर मडगावहून सुटणारी जनशताब्दी एक्स्प्रेसही सोडण्यात आली आहे.

ठळक मुद्देकोकण रेल्वेच्या ८ गाड्या रद्द, ७ गाड्यांच्या मार्गात बदलमुंबईहून नेत्रावती सोडण्यात आली, मडगावहून जनशताब्दी सुटली

रत्नागिरी : मध्य रेल्वेच्या आपटा - जिते रेलमार्गावर दरड कोसळल्याने व अनेक ठिकाणी रेलमार्गावर पाणी आल्याने सोमवारी दुसऱ्या दिवशीही कोकण रेल्वेच्या सेवेवर परिणाम झाला. कोकण रेल्वेने मडगाव - मुंबई मार्गावरच्या आजच्या ८ गाड्या रद्द केल्या आहेत. तर केरळहून निझामुद्दीन, चंडीगढ, पोरबंदर, अजमेर मार्गावर धावणाऱ्या गाड्या अन्य मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत, तर चार गाड्या उशीरा धावत आहेत. सकाळी ११.४५ वाजण्याच्या दरम्याने नेत्रावती एक्स्प्रेस सोडण्यात आली. तर मडगावहून सुटणारी जनशताब्दी एक्स्प्रेसही सोडण्यात आली आहे.आज धावणाऱ्या दादर - सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस, मडगाव - मुंबई सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस, मडगाव - सावंतवाडी - दिवा पॅसेंजर, दादर - मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, मुंबई सीएसएमटी - मडगाव मांडवी एक्स्प्रेस, दादर - रत्नागिरी पॅसेंजर, दिवा - सावंतवाडी पॅसेंजर, लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव डबल डेकर एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.३ ऑगस्ट रोजी सुटलेली एनार्कुलम - हजरत निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस पनवेल, वसई रोड, उधाना, जळगावमार्गे वळवण्यात आली आहे. ४ रोजी सुटलेली एनार्कुलम हजरत निजामुद्दीन मंगला एक्ल्प्रेस कोझरकोड, शोरनूर, पलक्कड, सालेम, जोलारपट्टी, रेनीगुंटा मार्गे, ४ रोजी सुटलेली एनार्कुलम - अजमेर मरुसागर एक्स्प्रेस त्रिसूर, पलक्कड, सालेम, जोलारपट्टी, मेलपक्कम, रेनीगुंटा मार्गे, हजरत निजामुद्दीन - थिरुवंतपूरम सेंट्रल राजधानी एक्सप्रेस नगाडा, उज्जैन, भोपाळ मार्गे, ५ रोजी सुटलेली तिरुनवेल्ली - जामनगर एक्स्प्रेस त्रिसूर, पलक्कड, सालेम, जोलारपट्टी, मेलपक्कम, रेनीगुंटामार्गे, कोचुवेल्ली - चंडीगढ केरळ संपर्क क्रांती एक्स्प्रेस त्रिसूर, पलक्कड, सालेम, जोलारपट्टी, मेलपक्कम, रेनीगुंटा मार्गे वळववण्यात आली आहे.३ रोजी सुटलेली कोचुवेली - चंडीगढ केरळ संपर्क क्रांती एक्स्प्रेस, कोईम्बतूर - हिसार एसी साप्ताहीक एक्सप्रेस, ४ रोजी सुटलेली मडगाव - हजरत निजामुद्दीन राजधानी एक्प्रेस, कोचुवेली - गंगानगर साप्ताहिक एक्स्प्रेस या गाड्या उशीरा धावत आहेत.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी