शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

HSC Result2024: राज्यात सलग १३ व्या वर्षी कोकण बोर्ड अव्वल

By मेहरून नाकाडे | Updated: May 21, 2024 14:08 IST

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र ...

रत्नागिरी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून एकूण निकाल ९७.५१ टक्के लागला आहे. कोकण विभागाची स्थापना २०१२ साली झाली. तेव्हापासून कोकण बोर्डाने राज्यात उत्कृष्ट निकालाची परंपरा राखत अव्वल क्रमांक आबाधित ठेवला आहे.राज्यातील एकूण नऊ मंडळामध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक आहे. या विभागातील रत्नागिरी सिंधुदूर्ग दोन्ही जिल्हयातून २५ हजार ७९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी २५ हजार १५३ विद्यार्थी पास झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत १.५ टक्केने वाढला आहे. कोकण बोर्डात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.६० टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.४२ टक्के आहे.कोकण बोर्डात उत्कृष्ट निकालामध्ये सलग बाराव्या वर्षी सिंधुदूर्ग जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. कोकण बोर्डाच्या प्रभारी सचिव सुवर्णा सावंत यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून बोर्डाने सलग १३ वर्षे उत्कृष्ट निकालाची परंपरा राखली असल्याचे सांगितले.

राज्यात गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढलीयंदा परीक्षेला बसलेल्या १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीचा निकाल ९३.३७ टक्के एवढा लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी २.१२ टक्क्यांनी जास्त आहे. गतवर्षी २०२३ चा निकाल ९१.३५ टक्के एवढा लागला होता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीHSC Exam Resultबारावी निकालkonkanकोकण