शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ओल्या काजूगरासाठी कोकण कृषी विद्यापीठाने शोधली नवी जात, यंत्राशिवाय काजूगर काढता येणार

By मेहरून नाकाडे | Updated: January 1, 2026 16:04 IST

लवकरच कलमे लागवडीसाठी उपलब्ध

मेहरून नाकाडेरत्नागिरी : कोकणातीलच नाही तर देशविदेशातील खवय्यांकडून ओल्या काजूगरासाठी वाढती मागणी आहे. त्यासाठी डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांच्या वेंगुर्ला प्रादेशिक संशोधन केंद्राने ‘वेंगुर्ला १०’ हे नवीन वाण विकसित केले आहे. उत्पादन, चव, उत्पन्न, सर्व स्तरावर हे वाण सरस ठरले असून, लवकरच या वाणाची कलमे शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.जानेवारीपासूनच ओल्या काजूचा हंगाम सुरू होतो. गावठी काजूचा हंगाम उशिरा सुरू होतो. विद्यापीठ प्रमाणित ‘वेंगुर्ला ६ व ७’चा हंगाम लवकर सुरू होतो. मात्र, या जातीच्या काजू बीच्या टरफलाची साल जाड असते. शिवाय तेलाचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे गर काढायला त्रास होतो, शिवाय त्वचेवर डाग पडतात. त्यामुळे वेंगुर्ला प्रादेशिक संशोधन केंद्राने संशोधन करून नवीन ‘वेंगुर्ला १०’ जात खास ओल्या काजूगरासाठी विकसित केली आहे. यामध्ये तेलाचे प्रमाण कमी आहे, त्वचेवर काही परिणाम होत नाही. शिवाय गर सहज कुणीही काढू शकेल इतकी साल पातळ आहे. वैशिष्ट्य म्हणजे काजू कलम लागवडीनंतर तिसऱ्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणात काजू उत्पादन सुरू होते. केवळ ओल्या काजूगरासाठी नाही तर प्रक्रिया, थेट खाण्यासाठीही उत्तम आहे. एका किलोमध्ये ११४ ते ११५ ओल्या काजू बी येतात, तर एका किलोला २५५ ते २५६ ओले काजूगर मिळतात. हा काजू खाण्यासाठी अतिशय चविष्ट आहे.

यंत्राशिवाय काजूगरओले काजूगर सर्वांनाच आवडतात. परंतु बी मधून गर काढणे अवघड असते. शिवाय काढणाऱ्याच्या त्वचेवर डाग पडतात. मात्र, वेंगुर्ला प्रादेशिक संशोधन केंद्रात विकसित केलेले ‘वेंगुर्ला १०’ हे वाण सर्व दृष्टींनी फायदेशीर आहे. कोणत्याही यंत्राशिवाय काजूगर काढता येणार आहे. अवघ्या १८ ते २० सेकंदात गर काढता येणार आहे. सर्व स्तरावरील प्रात्यक्षिकानंतर संशोधन केंद्रातर्फे दोन हजार कलमे तयार करण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Konkan University discovers new cashew variety, easier to extract kernel.

Web Summary : Konkan Agricultural University developed 'Vengurla 10' cashew for easier kernel extraction. It features less oil, thinner shell, and early, abundant production. The variety is suitable for fresh consumption and processing. Kernel extraction is also possible without a machine.