शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी: आडिवरे गावातून 'कोल्हापुरी चप्पल' पोहोचली थेट 'लंडन'ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 18:58 IST

साेशल मीडियावर व्हिडीओ अपलाेड झाला आणि हा व्हिडीओ पाहून दिल्लीतून पहिली ऑर्डर

अरुण आडिवरेकररत्नागिरी : चप्पल म्हटली की, सर्वांत आधी आठवते ती ‘काेल्हापुरी’. याच चप्पलला आता लंडनमध्येही पसंती मिळत आहे. आडिवरे (ता. राजापूर) या ग्रामीण भागात तयार झालेली ही चप्पल थेट लंडनला पाेहाेचली आहे. आडिवरे गावातील सुनील सूर्यकांत आडिवरेकर या तरुणाने तयार केलेली ही चप्पल सातासमुद्रापार पाेहाेचली आहे.आडिवरे येथे सुनीलचे वडील सूर्यकांत आडिवरेकर यांचे छाेटेसे दुकान आहे. वडिलांसाेबत दुकानात येता येता चप्पल तयार करण्याची कला त्याला आकर्षित करू लागली. त्यानंतर वयाच्या दहाव्या वर्षी त्याने वडिलांबराेबर व्यवसायाला सुरुवात केली. गाव छाेटेसे असल्याने गावात राहून आपल्या कलेचे चीज हाेणार नाही, असे मनात ठरवून त्याने मुंबई गाठली. मुंबईत आपले बस्तान बसवीत असतानाच वयाच्या २५ व्या वर्षी वडिलांचे अकाली निधन झाले. ज्यांच्या हाताला धरून त्याने व्यवसायाला सुरुवात केली हाेती, ताे मायेचा हातच त्याच्या पाठीवरून दूर गेला हाेता.मुंबईत काम करताना त्याने काेल्हापुरी चप्पल तयार करण्यास सुरुवात केली. त्याने बनविलेली पहिली चप्पल मुंबईतील वरळी भागात गेली आहे. त्याचवेळी साेशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ अपलाेड झाला आणि  हा व्हिडीओ पाहून दिल्लीतून पहिली ऑर्डर आली. त्यानंतर हैदराबाद याठिकाणी त्याने चप्पल पाठविली.साेशल मीडियावरील व्हिडीओ पाहून लंडन येथील रतन जयस्वाल नावाच्या व्यक्तीने सुनीलशी संपर्क साधून चप्पलची मागणी केली. त्याने आडिवरे येथून ही चप्पल मुंबईतील अंधेरी येथे पाठविली असून, तेथून ती लंडनच्या दिशेने रवाना झाली आहे.

आज बाबा हवे हाेतेआपल्या वडिलांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या सुनीलचा ते आधारस्तंभ हाेते. वडिलांकडूनच त्याने ही कला अवगत केल्याचे ताे अभिमानाने सांगताे. आज आपण बनविलेली चप्पल लंडनला गेल्याचे बाबांना कळले असते तर त्यांनी माझे काैतुक केले असते. हा आनंदाचा क्षण पाहण्यासाठी ‘आज, बाबा हवे हाेते,’ असे त्याने सांगितले. बाबांच्या आठवणीने त्याचे डाेळे भरले हाेते.

..अन् त्याने मुंबई साेडलीअनेक जण मुंबईत आपले आयुष्य घडविण्यासाठी जातात. तसाच सुनीलही गेला हाेता. मुंबईत राहिल्यानंतर त्याने जम बसविण्यास सुरुवातही केली. मात्र, काेराेनाच्या काळात त्याच्या पंखातील बळ कमी झाले. लग्न झाल्याने बायकाे आणि मुलगी यांची जबाबदारी हाेतीच. त्यामुळे त्याने मुंबई साेडण्याचा निर्णय घेतला आणि ताे आडिवरे गावी आला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी