शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत क्षुल्लक कारणावरून एकावर चाकूने हल्ला, एक जखमी

By मनोज मुळ्ये | Updated: December 16, 2023 18:11 IST

रत्नागिरी : क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ करत प्रौढावर चाकू उगारल्याने त्यात त्यांचा मेहुणा जखमी झाल्याची घटना रत्नागिरी शहरातील उद्यमनगर परिसरात ...

रत्नागिरी : क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ करत प्रौढावर चाकू उगारल्याने त्यात त्यांचा मेहुणा जखमी झाल्याची घटना रत्नागिरी शहरातील उद्यमनगर परिसरात गुरुवारी रात्री घडली. ओमकार शिंदे असे जखमी झालेल्याचे नाव असून, चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत यशवंत शांताराम सावंत (५१, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा सेंट्रिंगचा व्यवसाय असून, गुरुवारी रात्री त्यांचा शेजारी ओमकार शिंदे याचा भाऊजी प्रशांत ठावरे हा सावंत यांच्या घराजवळ आला. त्याच्यासाेबत शंकर तारवे ऊर्फ अपी, साैरभ तारवे आणि विजय चव्हाण हेही हाेते. यावेळी प्रशांत ठावरे यांनी ‘माझा मेहुणा ओमकार शिंदे तुमच्याकडे कामाला येणार नाही,’ असे बाेलून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.त्याचवेळी विजय चव्हाण याने त्याच्याजवळील चाकू यशवंत सावंत यांच्यावर उगारला. प्रसंगावधान राखत ते बाजूला झाले असता, हा चाकू त्यांचा आतेभाऊ मंगेश रामचंद्र जाधव यांच्या डाव्या खांद्याला लागला. त्यामध्ये त्यांना दुखापत झाली. त्यानंतर प्रशांत ठावरे, शंकर तारवे, साैरभ तारवे यांनी सावंत यांना मारहाण केली. तसेच कोयता दाखवून ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस