शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

किरण सामंत यांचा रोख कोणावर?, स्टेटसवर ठेवलेल्या 'मशाल' चिन्हामुळे राजकीय चर्चेंना उधाण

By मनोज मुळ्ये | Updated: September 29, 2023 17:37 IST

‘जो होगा वो देखा जाएगा’ अशी टॅगलाईनही

रत्नागिरी : प्रसिद्ध उद्योजक आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी त्यांच्या व्हॉटस्ॲप डीपीला (डिस्प्ले पिक्चर) मशालीचे चित्र ठेवल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघासाठी संभाव्य नाव म्हणून चर्चेत असलेल्या किरण सामंत यांचा रोख आमदार नितेश राणे यांच्यावर असल्याचे वरकरणी दिसत असले तरी त्यांचा रोख ‘नेहमी खरं बोलतो’ असे म्हणणाऱ्या राजकीय नेत्यावर असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरुन स्पष्ट होत आहे.रत्नागिरी लोकसभा मतदार संघासाठी शिवसेनेकडून किरण सामंत यांचे नाव पुढे येत आहे. आमदार नितेश राणे यांनी वेगळी भूमिका मांडली. हा मतदार संघ भाजपचा आहे आणि जर किरण सामंत यांना निवडणूक लढवायची असेल तर त्यांना भाजपमध्ये यावे लागेल, असे आमदार राणे म्हणाले.या एकूणच राजकीय पार्श्वभूमीवर शुक्रवारी उद्योजक किरण सामंत यांचे व्हॉटस्ॲप डीपी चर्चेचे झाले. त्यांनी आपल्या डीपीला मशालीचे चित्र ठेवले. ‘जो होगा वो देखा जाएगा’ अशी टॅगलाईनही होती. त्यामुळे लगेचच त्यावर चर्चा सुरू झाली. काही वेळातच त्यांनी डीपी बदलले. अलिकडेच नितेश राणे यांनी लोकसभा उमेदवारीवरुन जे विधान केले, त्याला उद्देशून त्यांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा सुरू झाली. मात्र ज्यावेळी किरण सामंत यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली, तेव्हा त्यांच्या बोलण्याचा रोख कोकणावर नसून, पुणेकरांवर असल्याचे स्पष्ट झाले.जे कोण स्पष्ट बोलण्याचा, खरं बोलण्याचा आव आणतात, जे स्वत:चं झाकून ठेवतात आणि दुसऱ्याचे वाकून पाहतात, त्यांच्या नोबॉलवर फ्री हीट देणार, असे किरण सामंत यांनी सांगितले. खरं बोलणारे पुणेकर नेते त्यांच्या ‘टार्गेट’वर असल्याचे स्पष्ट होत आहे. खरं बोलणारे नेते सध्या सर्वच विभागात अधिक लक्ष देत असल्याने हा रोख त्यांच्यावरच असल्याचे स्पष्ट आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेUday Samantउदय सामंत