खेडचे ‘टॅलेंट’ मलेशियाला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 06:19 PM2017-08-03T18:19:29+5:302017-08-03T18:19:29+5:30

खेड : रोटरी इंग्लिश मीडिअम स्कूल, खेडच्या त्रियोगिनींची ‘आशिया गॉट टॅलेंट’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये निवड झाली असून, रोटरी स्कूलचे योगा मार्गदर्शक मंगेश खोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिघीही मलेशियाकडे रवाना झाल्या आहेत.

Khed's 'talent' leaves for Malaysia | खेडचे ‘टॅलेंट’ मलेशियाला रवाना

खेडचे ‘टॅलेंट’ मलेशियाला रवाना

Next


खेड : रोटरी इंग्लिश मीडिअम स्कूल, खेडच्या त्रियोगिनींची ‘आशिया गॉट टॅलेंट’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये निवड झाली असून, रोटरी स्कूलचे योगा मार्गदर्शक मंगेश खोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिघीही मलेशियाकडे रवाना झाल्या आहेत.


मलेशिया येथे होणाºया आशिया खंड मर्यादित ‘आशिया गॉट टॅलेंट’ या शोसाठी प्रियांका बबन जाधव, अक्षता हरिश्चंद्र कदम, अंकिता हरिश्चंद्र कदम या त्रियोगिनींची निवड झाली असून, चित्रीकरणासाठी त्या विमान प्रवासाने मलेशिया येथे रवाना झाल्या आहेत. या त्रियोगिनी संपूर्ण भारताचे नेतृत्व करणार आहेत.


रोटरी स्कूलसह खेड तालुक्याचे नाव भारताबाहेर चमकवण्याचे काम रोटरी स्कूलच्या या त्रियोगिनी करणार आहेत. त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रियांका बबन जाधव, अंकिता हरिश्चंद्र कदम व अक्षता हरिश्चंद्र कदम यांनी आजपर्यंत योगामध्ये तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील शालेय व असोसिएशनच्या स्पर्धा गाजवत अल्पावधीतच त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी मारली आहे.
 

 

Web Title: Khed's 'talent' leaves for Malaysia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.