खेड तालुक्यात १५ शाळा बाह्य मुले शिक्षण प्रवाहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST2021-03-22T04:27:55+5:302021-03-22T04:27:55+5:30
खेड : कोरोनामध्ये लॉकडाऊन काळात परजिल्ह्यातून काही कुटुंबे तालुक्यातील विविध गावांमध्ये आली आहेत. या कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित ...

खेड तालुक्यात १५ शाळा बाह्य मुले शिक्षण प्रवाहात
खेड : कोरोनामध्ये लॉकडाऊन काळात परजिल्ह्यातून काही कुटुंबे तालुक्यातील विविध गावांमध्ये आली आहेत. या कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी शासनाच्या सूचनेनुसार सलग दहा दिवस शाळाबाह्य शोधमोहीम तालुक्यात राबविण्यात
आली. आतापर्यंत ४३,९५३ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्याअंतर्गत १५ शाळा बाह्य मुले शाळेत दाखल झाली आहेत.
त्याचबराेबर स्थलांतरित ७९ मुले तालुक्यात आली आहेत. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर मोलमजुरी करण्यासाठी तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांच्या प्रकल्पावर कामगारांचे तांडे अन्य जिल्ह्यातून आले आहेत. परजिल्ह्यातून आलेली ही मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम सुरू आहे. स्थलांतरित होऊन आलेल्या मुलांमध्ये विशेष गरजा असलेली १५ मुले आहेत. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही मोहीम प्राधान्याने राबवली जात आहे.