खेडच्या सभापतींनी घेतली खासदारांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:31 IST2021-04-17T04:31:07+5:302021-04-17T04:31:07+5:30

खेड : पंचायत समितीच्या नूतन सभापती मानसी जगदाळे, शिवसेना तालुकाप्रमुख विजय जाधव, तालुका संघटक महेंद्र भोसले, तालुका सचिव सचिन ...

Khed speakers met the MPs | खेडच्या सभापतींनी घेतली खासदारांची भेट

खेडच्या सभापतींनी घेतली खासदारांची भेट

खेड : पंचायत समितीच्या नूतन सभापती मानसी जगदाळे, शिवसेना तालुकाप्रमुख विजय जाधव, तालुका संघटक महेंद्र भोसले, तालुका सचिव सचिन धाडवे, सहसंघटक व घाणेखुंट ग्रामपंचायतीचे सरपंच अंकुश काते, सहसचिव संदीप कांबळे या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चाही करण्यात आली.

खेडच्या पदाधिकाऱ्यांची नव्याने निवड झालेली असून, त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे. चांगले काम करा. संघटना वाढीसाठी रात्रंदिवस काम करा. संघटना तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहे, असेही यावेळी विनायक राऊत यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी बांधकाम व आरोग्य सभापती अण्णा कदम, माजी शिक्षण सभापती सुनील मोरे, लोटेचे सरपंच चंद्रकांत चाळके, माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे, महेश जगदाळे, तुषार मोरे, चिपळूण मतदार क्षेत्रप्रमुख बाळा कदम, राजू देवळेकर व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Khed speakers met the MPs