खेड : खाडीपट्ट्यातील मासेमरतूक रोजचीच!

By Admin | Updated: September 20, 2014 00:21 IST2014-09-19T23:20:49+5:302014-09-20T00:21:58+5:30

जगबुडीतील थैमान : प्रदूषित पाणी घेतेय माशांचा जीव...

Khed: Only a day's fish fish farming! | खेड : खाडीपट्ट्यातील मासेमरतूक रोजचीच!

खेड : खाडीपट्ट्यातील मासेमरतूक रोजचीच!

खेड : खाडीपट्ट्यातील जगबुडी नदी आणि खाडीत दररोज मासे मरण्याच्या घटना घडत आहेत़ माशांचा अक्षरश: खच पडला आहे. लोटे आद्यौगिक वसाहतीमधून सोडण्यात येत असलेल्या रासायानिक पाण्यामुळेच हे मासे मरत होत असल्याचे अनेकवेळा केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. तसा अहवाल येथील तहसीलदारांना तसेच कोल्हापुर येथील प्रदूषण नियंत्रण विभागाला सादर करण्यात आला आहे़
सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही हे रासायनिक पाणी सोडण्यात येत असल्याने न्यायालयाचा अवमान होत होत आहे़ यामुळे संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे़
बहिरवली, तुंबाड आणि कर्जी परिसरातील गावातील नदी आणि खाडी परिसरात असे प्रकार नित्याचे झाले आहेत़ येथील खाडीलगत जगबुडी नदीची वारंवार पाहणी व पंचनामा करण्यात आला़ यावेळी नदीतील पाण्याचा रंग हलका काळसर आढळला़ तसेच नदीपात्रात काळचरू, बोथरेट, कोळंबी आदी प्रकारचे मासे मृतावस्थेत आढळले होते़ हे मासे पाण्यावर तरंगताना आढळल्याचे ग्रामस्थांनी पाहिले.
याबाबत तहसीलदार यांना तसा अहवालदेखील सादर करण्यात आले आहेत. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बोटचोपे पद्धतीच्या भूमिकेमुळे या मासेमारीला आळा घातला जात नसल्याचे दिसून येत आहे. न्यायालयात याबाबत चौकशी सुरू असतानाही सीईटीपीतून पाणी सोडण्यात येते तसेच यामुळे मासे मरण्याच्या घटना होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
हा न्यायालयाचा अवमान आहे. याबाबत पुनर्दुरूस्ती याचिका लवकरच दाखल होणार असल्याची माहिती खाडीपट्ट्यातील ग्रामस्थांनी दिली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रकाराकडे लक्ष देत नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

प्रकार थांबणार कधी?
लोटे औद्योगिक वसाहतीतील शेतकरी, नागरिकांनी व्यक्त केली चिंता
प्रदूषण नियंत्रण मंडळ करतेय काय
मासे मरण्याचे प्रकार वारंवार
संबंधित कारखान्यावर कारवाईची मागणी
बहिरवली, तुंबाड,कर्जी गावाना मोठा फटका
पंचनाम्याचा काय उपयोग

Web Title: Khed: Only a day's fish fish farming!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.