खेड - दापाेली गाडीमधून बॅग गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:30 IST2021-04-06T04:30:19+5:302021-04-06T04:30:19+5:30

दापोली : खेड - दापाेली या एस. टी. बसने प्रवास करत असताना न. का. वराडकर व रा. वि. बेलाेसे ...

Khed - Missing bag from Dapali vehicle | खेड - दापाेली गाडीमधून बॅग गहाळ

खेड - दापाेली गाडीमधून बॅग गहाळ

दापोली : खेड - दापाेली या एस. टी. बसने प्रवास करत असताना न. का. वराडकर व रा. वि. बेलाेसे महाविद्यालयातील निनाद चाैगुले यांची बॅग हरविल्याची घटना घडली आहे. या बॅगेमध्ये महत्त्वाची कागदपत्रे असून, बॅग सापडल्यास महाविद्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निनाद सुरेश चौगुले हे साेमवारी खेड - दापोली बसने प्रवास करत हाेते. या प्रवासादरम्यान त्यांची काळ्या रंगाची बॅग हरवली असून, या बॅगेमध्ये निनाद चौगुले, रोहन कांबळे, तनय मालवे यांची एनसीसीची ‘सी’ कागदपत्रे हाेती. तसेच एनसीसीची दोन पुस्तकेही हाेती. गहाळ झालेली पिशवी कोणाला सापडल्यास दापोलीतील वराडकर महाविद्यालयाचे प्रशासन किंवा निनाद चौगुले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रा. सीता फुले यांनी केले आहे.

Web Title: Khed - Missing bag from Dapali vehicle