शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

खापरेवाडीतील ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 15:32 IST

श्रमदान, ग्रामवर्गणी, नारकर ट्रस्ट या सेवाभावी संस्थेची प्रेरणा यातून कोकणी मनात स्ववलंबनाचा हूंकार जागा झाला नि गेल्या चार पिढ्याची खापरेवाडीतील ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण हक्काच्या पाणी पुरवठा योजनेने थांबली. योजनेचे उदघाटन सुनिल नारकर टूस्टच्या अध्यक्षा शांता नारकर यांच्या अध्यक्षतेखाली व विनय रानडे यांचा हस्ते झाले.

ठळक मुद्दे श्रमदान, ग्रामवर्गणी, नारकर ट्रस्टची प्रेरणा लोकसहभागातून ग्रामस्थांना मिळाले हक्काचे पाणी

रत्नागिरी : श्रमदान, ग्रामवर्गणी, नारकर ट्रस्ट या सेवाभावी संस्थेची प्रेरणा यातून कोकणी मनात स्ववलंबनाचा हूंकार जागा झाला नि गेल्या चार पिढ्याची खापरेवाडीतील ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण हक्काच्या पाणी पुरवठा योजनेने थांबली. योजनेचे उदघाटन सुनिल नारकर टूस्टच्या अध्यक्षा शांता नारकर यांच्या अध्यक्षतेखाली व विनय रानडे यांचा हस्ते झाले.यावेळी दिपक खापरे, दिपक फेफडे, आण्णा सावंत, ट्रस्टचे संचालक राजेद्र्र लाड, पंचायत समिती सदस्य अभय खेडेकर, अजिंक्य बेर्डे, नवतरूण मंडळाचे नितीन खापरे, शिवसेना शाखा प्रमुख शहाजी शिर्के, सरपंच प्रकाश रांजे उपस्थित होते. राईपैकी खापरेवाडी बावीस उंबऱ्यांची वस्ती. येथे रस्ता, वीज पोहचलेय. पण पाण्याचे दुर्भिक्ष्य पाचवीलाच पुजलेले. डोंगराखालील अर्धार् किलोमिटरवरील शिर्के यांच्या जागेतील ओढ्यात खड्डा खोदून तांब्याने पाणी जमवावे लागते.प्रत्येक कुटुबांचे ५ ते ६ तास पाणी भरण्यात जाई. त्यामुळे मजुरीला जाता येत नव्हते. दिवस कामात तर रात्र पाण्यात हे जगण येथील महिल्याच्या नसीबी होते. या योजनेमुळे हक्काचे पाणी प्रत्येकाच्या घरात आले.भाऊ नारकर यांच्या कार्याचा वारसा सांगताना कै. सुनिल नारकर ट्रस्टच्या अध्यक्षा शांता नारकर यांनी ट्रस्टच्या संचालकापुढे खापरेवाडीतील पाणी टंचाईचे गांभिर्य मांडले नि संचालक विनय रानडे यांनी पाईप, मोटारीसाठी दोन लाख रुपये देवू केले. विहीर खोदाई, बांधकाम, चर खोदाई, पाईप जोडणी, वीज खांब उभारणी गावच्या श्रमदानातून झाली.योजनेस कमी पडणारा निधी कुंटुबामागे आठ हजार रुपयेप्रमाणे जमवून पावणे दोन लाख रुपयांचा स्व-निधी ग्रामस्थांनी बघता-बघता उभा केला. मुंबई मंडळाने भजन व कलेतून एक लाख पाण्यासाठी जमवले नि पावसाळ्यानंतर खापरेवाडीकरांनी एकेक दिवस करीत दोन महिन्यात अनंत व अनिल शिर्के बंधूच्या जमिनीत चाळीस फूटाचा परीघ व वीस फूट खोल विहीरीचे पक्के बांधकाम श्रमातून उभारले.ग्रामस्थांच्या कष्टाचे चीज झाले नि या विहीरीला चौदा फूट खोलीचा मुबलक पाणी साठा उपलब्ध झाला. विहीरीच्या वरील भागात वीज मोटार पंप हाऊस उभारले गेले. या लोकसहभागाचे नेतृत्व दिपक गणू खापरे यांनी करताना अंकुश खापरे, चंद्रकांत खापरे, शशिकांत खापरे, संतोष भोसले, प्रकाश पडे, सुविधा खापरे , गीता खापरे, रूपाली खापरे महिपती खापरे नवतरूण मंडळाचे अध्यक्ष सुनिल खापरे यांच्या एकीची साथ मोलाची ठरली. 

टॅग्स :WaterपाणीRatnagiriरत्नागिरी