केतकर-जोशी कुलसभेकडून पूरग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:32 IST2021-09-03T04:32:58+5:302021-09-03T04:32:58+5:30

चिपळूण : येथील महापुरात बाधित झालेल्या केतकर - जाेशी कुलबांधवांच्या पाठीशी केतकर - जाेशी कुलसभा खंबीरपणे उभी राहिली आहे. ...

Ketkar-Joshi Kulasabha helps flood victims | केतकर-जोशी कुलसभेकडून पूरग्रस्तांना मदत

केतकर-जोशी कुलसभेकडून पूरग्रस्तांना मदत

चिपळूण : येथील महापुरात बाधित झालेल्या केतकर - जाेशी कुलबांधवांच्या पाठीशी केतकर - जाेशी कुलसभा खंबीरपणे उभी राहिली आहे. या बांधवांना मदतीचा हात देत त्यांना आर्थिक मदत देण्यात आली. यासाठी कुलबांधवांनी सढळहस्ते सहकार्य केले.

महाराष्ट्रातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून या उपक्रमास भरपूर योगदान मिळाले. झटपट दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम कुलसभेकडे जमा झाली. सभेच्या सदस्यांनी चिपळूणमधील ज्यांचे पुरामुळे नुकसान झाले, त्यांची माहिती मिळवली आणि प्रत्येकाला शक्य तेवढी आर्थिक मदत दिली.

गेल्या वर्षीही कोरोना महामारीमुळे संकटग्रस्त झालेल्या अनेक समाजबांधवांना तसेच भिले या गावातील ग्रामस्थांना केतकर-जोशी कुल परिवाराने वस्तुरूप साहाय्य केले होते. केतकी, बिवली, भिले, करंबवणे पंचक्रोशी तसेच साखरपा, रत्नागिरी आणि इतर कोकणातील या भागातील कुलबांधव राहत असलेल्या गावात आम्ही सामाजिक कार्य म्हणून या भागात पायाभूत आणि मूलभूत विकासासाठी योजना आखत आहोत, असे कुलसभेचे अध्यक्ष संजय केतकर, उपाध्यक्ष राजीव केतकर, कार्यवाह आमोद केतकर, कोकण विभाग प्रमुख मधुसूदन केतकर यांनी सांगितले.

Web Title: Ketkar-Joshi Kulasabha helps flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.