शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

मोबाईल बाजूला ठेवून चिमुकले रंगले शेतीत, अनुभवली भातशेती लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 14:59 IST

मेहरून नाकाडे  रत्नागिरी : शाळेची वेळ सोडली तर बहुतांश मुले ही फावल्या वेळेत मोबाईलमध्येच रमतात. अशावेळी या मुलांना खाण्या-पिण्याचेही ...

ठळक मुद्देमोबाईल बाजूला ठेवून चिमुकले रंगले शेतीत प्रत्यक्ष अनुभवली भातशेती लागवड

मेहरून नाकाडे रत्नागिरी : शाळेची वेळ सोडली तर बहुतांश मुले ही फावल्या वेळेत मोबाईलमध्येच रमतात. अशावेळी या मुलांना खाण्या-पिण्याचेही भान राहात नाही. हल्ली तर मैदानावर प्रत्यक्ष खेळण्याऐवजी मोबाईलवर गेम खेळायला त्यांना आवडते. परंतु निगुंडळ (ता. गुहागर) येथील मुलांनी चक्क मोबाईल बाजूला ठेवून प्रत्यक्ष रोटरी टिलर चालविण्याचा आनंद घेतला. भात लागवडीपूर्वी नांगरणी कशी करावी, यांत्रिक नांगरणीमुळे वेळ कसा वाचतो, याचा अनुभव त्यांनी घेतला. त्यासाठी त्यांना गजेंद्र पौनिकर यांनी प्रोत्साहित करून शेतीतील काही महत्त्वाच्या गोष्टीही सांगितल्या.निगुंडळ येथे मुकनाक यांच्या शेतात भात लावण्यासाठी ह्यरोटरी टिलरह्णने नांगरणी सुरु असताना, शुभम व तुषार शिरकर, मयूर व मयुरी नाणीस्कर, तन्वी मुकनाक ही मुले अचानक शेतात आली. शेताच्या बांधावर उभी राहून ती नांगरणी कशी होते, हे पाहत होती. त्यांची उत्सुकता वाढली आणि बांधावरून उतरून रोटरी टिलरसोबत पौनिकर यांच्याबरोबर शेतभर फिरू लागली.

दोन राऊंड झाल्यानंतर..अरे एका जागी बसा..थांबा..पाय दुखतील, असे पौनिकर यांनी सांगितले. त्यावर नाही काका..आम्हाला चालवायला द्याल का? अशी विचारणा केली. यावर त्यांना थांबा थोडं सांगून सुरक्षित व मोकळ्या जागेत टिलर आल्यानंतर यातील एका मुलाच्या हातात त्यांनी टिलर दिला. अर्थात पौनिकर सोबत होतेच.

क्लच दाबून ठेवला की टिलर सुरु..हे न सांगताच या मुलांनी निरीक्षणातून अनुभवलं. टिलर चालवताना तो कशा पध्दतीने फिरवावा, याचंही निरीक्षण मुलांनी केलं होतं. प्रत्येकाने एक-एक राऊंड टिलर चालविण्याचा आनंद घेतला. यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. मुलं-मुली प्रत्यक्ष टिलर चालविण्यात रममाण झाली होती. त्याचवेळी टिलरची किंमत, त्याचा वापर, कुठे खरेदी करावा, त्याची वॉरंटी याबाबत जेवढे प्रश्न होते, ते त्यांनी पौनिकर यांना विचारले. त्यातील एका मुलाने तर घरी जाऊन आजीला सांगितलं, ह्यमी टिलर चालवला..आपणही पुढच्या वर्षी असा टिलर घेऊया.लहान मुलांना रोटरी टिलर चालवायला शिकवताना, प्रत्यक्ष त्यांच्या हातात तो देताना पौनिकरांनी कोणताही किंतु परंतु न ठेवता, मोकळेपणाने हो म्हटले. त्यामुळे रोटरी टिलर चालविण्याचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.प्रत्यक्ष नांगरणीचा घेतला अनुभवभात लागवडीपूर्वी नांगरणी महत्त्वपूर्ण आहे. पारंपरिक नांगरणीपेक्षा रोटरी टिलरच्या सहाय्याने नांगरणी कमी श्रमात, कमी वेळेत होते, या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव लहान मुलांनी घेतला. निगुंडळ येथील मुलांनी रोटरी टिलर चालविण्याबरोबरच बालसुलभ बुद्धीने टिलरबाबत प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसनही करून घेतले.शेतीसाठी मजुरांची कमतरताशेतीसाठी मजुरांची कमतरता हा मोठा प्रश्न आहे. मजुरांअभावी मोठी शेतजमीन पडीक बनली आहे. भातशेती सोडून काहींनी फळबाग लागवड केली आहे. शेतीसाठी प्रोत्साहित करण्याकरिता शासन विविध योजना राबवित आहे. याचवेळी शेतीबाबत लहान मुलांमध्ये असलेल्या उत्सुकतेमुळे शेतीला नक्कीच चांगले दिवस येतील.उत्सुकता वाढतेमुलांनी एखादी गोष्ट मागितली की, प्रथम त्यांना दटावले जाते. त्यापेक्षा त्यांना त्या गोष्टीचा अनुभव घेण्यापासून परावृत्त न केल्यास नक्कीच त्यांची उत्सुकता वाढते. मोबाईलचे वेड कमी करण्यासाठी पालकांनी स्वत: काम करीत असताना मुलांना बरोबर ठेवले, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली तर नक्कीच याचा आनंद मिळेल.

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी