मासेमारी करताना सुरक्षितता अबाधित ठेवा

By Admin | Updated: April 2, 2015 00:42 IST2015-04-01T22:29:46+5:302015-04-02T00:42:52+5:30

आशिष मोहिते : गावखडीत सागरी सुरक्षिततेबाबत जनजागृती कार्यक्रम

Keep fishing safe while fishing | मासेमारी करताना सुरक्षितता अबाधित ठेवा

मासेमारी करताना सुरक्षितता अबाधित ठेवा


रत्नागिरी : मच्छीमार बांधवानी मासेमारी करताना आपली सुरक्षितता अबाधित ठेवून शास्त्रोक्त पदधतीने मासेमारी करावी, असे आवाहन मत्स्य अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ़ आशिष मोहिते यांनी केले़
पूर्णगड खाडी मच्छीमार व्यावसायिक संस्था मर्यादित, गावखडी, आणि मत्स्य महाविद्यालय, शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सागरी सुरक्षितता’ या विषयावर गावखडी येथे एक दिवसीय जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,़ त्यावेळी मोहिते बोलत होते. पूर्णगड खाडी मच्छीमार व्यावसायिक संस्था मर्यादित, गावखडीचे अध्यक्ष सनीफ गवाणकर यांनी अध्यक्षस्थान भुषविले़ यावेळी सचिव इक्बाल लांबाडे व सादिक भाटकर उपस्थित होते़ सादीक दर्वेश, शफी दर्वेश व सुरैय्या लांबाडे यावेळी उपस्थित होते़
प्रा. तौसीफ काझी यांनी मासेमारीला खोल समुद्रात जाताना आवश्यक असलेली जीवरक्षक, तसेच नौका आपत्तीत वापरावयाची आपत्तीदर्शक साधने, वापर व महत्त्व याविषयी माहिती दिली़ प्रा. दीप्ती साळवी यांनी अग्निशामक उपकरणे, त्यांचे विविध प्रकार आणि उपयोग याविषयी माहिती दिली. प्रा. निलेश्वरी वऱ्हेकर यांनी दळणवळणाची साधने व मासेमारीसाठी आवश्यक मत्स्यशोधक यंत्र याविषयी माहिती दिली़ डॉ़ राहूल सदावर्ते यांनी नौकानयनाच्या आधुनिक उपकरणांचा वापर करून संभाव्य मत्स्य साठ्यांच्या निश्चित ठिकाणी पोहचण्यासाठी कसा उपयोग करता येईल याविषयी माहिती दिली़ प्रा. सुशील कांबळे यांनी भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र यांच्या सहाय्याने पांरपरिक मासेमारीच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी उपग्रहाद्वारे मत्स्य साठ्यांची माहिती मच्छिमारांना उपलब्ध होऊ शकते याविषयी माहिती दिली. तौफिन बाग यांनी ट्रॉल नेटच्या आधुनिक खोलाच्या सहाय्याने मासेमारी केल्याने लहान माशांना कसे जीवदान मिळते, याविषयी माहिती दिली़ सुरक्षा उपकरणांचे गावखडी येथे प्रदर्शन मांडण्यात आले होते़ प्रस्तावना तृप्ती जाधव व आभार प्रदर्शन पृथा सांवत यांनी केले़ महेश किल्लेकर आणि विनय पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Keep fishing safe while fishing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.