शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरमधील कळसवली ग्रामपंचायत रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 15:55 IST

पुरस्कारामध्ये गुहागर तालुक्याचे वर्चस्व

रत्नागिरी : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२३-२४ मध्ये राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला तसेच गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीने द्वितीय तर चिखली ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळविला तसेच आणखी तीन ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांची घोषणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केली आहे.या अभियानांतर्गत जिल्हा परिषद गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या ग्रामपंचायतींमधून सर्वांत जास्त गुण प्राप्त करणाऱ्या ९ ग्रामपंचायतींची तपासणी जिल्हास्तरीय तपासणी समितीकडून करण्यात आली होती. त्यातून जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतींची नावे निश्चित करण्यात आली.प्रथम क्रमांक पटकावलेल्या कळसवली ग्रामपंचायतीला ६ लाख रुपये, द्वितीय क्रमांकाच्या खामशेत ग्रामपंचायतीला ४ लाख रुपये आणि चिखली ग्रामपंचायतीला ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. लवकरच या पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कारस्व. वसंतराव नाईक पुरस्कार - आबलोली ग्रामपंचायत (गुहागर) (सांडपाणी व्यवस्थापन)डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार - नाचणे ग्रामपंचायत (रत्नागिरी) (पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन)स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार - उमराठ ग्रामपंचायत (गुहागर) (शौचालय व्यवस्थापन)या ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत.

पुरस्कारामध्ये गुहागर तालुक्याचे वर्चस्वजिल्हा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या ६ पैकी ४ पुरस्कार गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायतींनी पटकाविले आहेत. त्यामध्ये गुहागर तालुक्याने स्वच्छतेमध्ये द्वितीय पुरस्कार खामशेत ग्रामपंचायतीने तर तृतीय पुरस्कार चिखली ग्रामपंचायतीने तर विशेष पुरस्कार आबलोली आणि उमराठ ग्रामपंचायत यांना जाहीर करण्यात आले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायतRajapurराजापुरguhagar-acगुहागर