भाच्याने केला काकाचा खून
By Admin | Updated: January 20, 2015 00:53 IST2015-01-20T00:35:53+5:302015-01-20T00:53:09+5:30
देवदेवस्कीचा प्रकार : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते येथील घटना

भाच्याने केला काकाचा खून
देवरूख : आत्याचा नवरा देवदेवस्की करीत असल्याने आपण नेहमी आजारी पडतो, या संशयातून भाच्याने काकाच्या डोक्यात कोयत्याचे वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते येथे घडला.संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते (तेलीवाडी) येथे सुधाकर यशवंत पाटील (वय ६३, कळंबस्ते), प्रमोद मनोहर भाटकर (५९, कळंबस्ते-तेलीवाडी) हे राहत होते. सुधाकर हे प्रमोद यांच्या आत्याचे यजमान असून, ते देवदेवस्कीचा धंदा करीत असल्याने आपण नेहमी आजारी पडतो, असा संशय प्रमोद भाटकर याला आला.चार ते पाच महिन्यांपूर्वी प्रमोद भाटकर याने त्यांच्या घरी येऊन बघून घेण्याची धमकी दिली होती. संशयाने पिछाडलेल्या प्रमोद भाटकर याने संधीचा फायदा घेऊन रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सुधाकर पाटील यांच्या
दरवाजा तोडून आरोपीला अटक
आरोपी आपल्या घरात आतून कडी लावून बसला होता. पोलिसांनी विनंती करूनही आरोपी बाहेर न आल्याने शेवटी दरवाजा फोडून
या आरोपीला पकडण्यात आले.