शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

काजिर्डा-जामदा प्रकल्पाविरोधात काजिर्डावासीय आंदोलन छेडणार, दडपशाहीने काम सुरू केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 16:17 IST

गेली २५ वर्षे जामदा प्रकल्पाविरोधी लढा प्राणपणाने लढत आहे

पाचल : महाराष्ट्र शासनाने ४ डिसेंबर २०१५ मध्ये काजिर्डा-जामदा प्रकल्पाची घोषणा केली. मात्र, या प्रकल्पाला ग्रामस्थांचा सुरुवातीपासूनच तीव्र विरोध आहे. या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले असून, हे काम दडपशाहीने सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकल्पाविरोधात काजिर्डा येथील ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.गेली २५ वर्षे जामदा प्रकल्पाविरोधी लढा प्राणपणाने लढत आहे. प्रकल्पाच्या कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रक्रणी न्यायालयात या प्रकल्पाची चौकशी सुरू होती. त्यामुळे या प्रकल्पाचे काम तब्बल आठ ते दहा वर्षे बंद होते. मात्र, आता या प्रकल्पाचे काम ग्रामस्थांना विश्वासात न घेता दडपशाहीने सुरू करण्यात आले आहे. प्रकल्पाचे काम सुरू करण्याबाबत न्यायालयाच्या चौकशीचे काय झाले, काम सुरू करण्याबाबत न्यायालयाचा काय आदेश आहे, याबाबत अधिकारी व ठेकेदार काहीही बोलण्यास तयार नाही. ग्रामस्थांना व ग्रामपंचायतीला कोणतीही माहिती न देता, त्यांच्याशी कोणतीही चर्चा अथवा बैठक न घेता पोलिस फौजफाटा उभा करून ग्रामस्थांचा आवाज दडपण्याचा प्रकार सुरू आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अधिकारी व ठेकेदाराच्या  मनमानी कारभाराविरोधात  ग्रामस्थ आता आक्रमक झाले असून, प्रकल्पस्थळीच लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन छेडण्याच्या इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.धरणाचे काम सुरू करण्यापूर्वी ५० टक्के पुनर्वसन झाल्यानंतरच धरणाचे काम सुरू करावयाचे असते. धरणाचे काम सुरू करण्यापूर्वी ग्रामस्थ, अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन पुनर्वसन कुठे करणार, धरणग्रस्तांना कोणत्या सुविधा उपलब्ध करून देणार, पुनर्वसनाचा संपूर्ण आराखडा ग्रामस्थांसमोर मांडावयाचा असतो.

मात्र, याबाबत ग्रामस्थांना कोणतीही माहिती न देता, शासन नियम-निकष बाजूला ठेवून काम सुरू आहे. अधिकाऱ्यांना चर्चेसाठी निवेदन व निमंत्रण देऊनही जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे काजिर्डा ग्रामस्थांनी धरण प्रकल्प अधिकारी, ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी