पाेस्टर चित्रकला स्पर्धेत काैशिक पाल प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:37 IST2021-09-04T04:37:27+5:302021-09-04T04:37:27+5:30
दापाेली : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दापाेलीतील कृषी महाविद्यालयाच्या जीमखाना विभागातर्फे पोस्टर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ...

पाेस्टर चित्रकला स्पर्धेत काैशिक पाल प्रथम
दापाेली : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दापाेलीतील कृषी महाविद्यालयाच्या जीमखाना विभागातर्फे पोस्टर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कौशिक आर. पाल याने प्रथम क्रमांक मिळवला.
या स्पर्धेत द्वितीय क्रमांक यामिनी गुलाब मते, तृतीय क्रमांक अक्षदा शिवाजी वेखंडे, उत्तेजनार्थ क्रमांक जान्हवी सतीश गावकर, राहुल सुभाष मोरे यांनी मिळवला. स्पर्धेत सहभागी झालेल्या व विजेत्या विद्यार्थ्यांचे सहयाेगी अधिष्ठाता डॉ. उत्तम महाडकर, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. व्ही. एस. दांडेकर, शारीरिक प्रशिक्षण निर्देशक डॉ. मोहित शिंदे यांनी कौतुक केले. क्रीडा दिनानिमित्त कृषी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांकरिता शारीरिक सुदृढता घटक चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी वेगवेगळ्या घटकांची तपासणी करुन डॉ. सीमा शिरसाठ, डॉ. मोहित शिंदे यांनी समुपदेशन केले. या शिबिराकरिता मिळालेला उत्स्फूर्त सहभाग पाहता डॉ. उत्तम महाडकर यांनी शारीरिक सुदृढतेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.