काेंडगाव ग्रामपंचायतीतर्फे सभापती जयसिंग माने यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:18 IST2021-03-30T04:18:44+5:302021-03-30T04:18:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगावचे सरपंच बापू शेट्ये यांनी तिहेरी संगम साधत पंचायत समिती सभापती जयसिंग ...

काेंडगाव ग्रामपंचायतीतर्फे सभापती जयसिंग माने यांचा सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगावचे सरपंच बापू शेट्ये यांनी तिहेरी संगम साधत पंचायत समिती सभापती जयसिंग माने यांचा गावाच्या व ग्रामपंचायतीतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी आशा, अंगणवाडीसेविका, डॉक्टर यांचा कोरोनायोद्धा म्हणून, सभापती जयसिंग माने यांचा सत्कार आणि ग्रामसचिवालय स्थलांतर उद्घाटन असा एकत्र संगम साधत शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून हा सोहळा पार पडला. यावेळी सभापती माने यांनी हास्याची लकेर उडवित शब्दांची जुगलबंदी केली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा करून कोंडगावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त केले.
सभापतिपदाचा मिळालेला अल्पकालावधी पाहता जास्तीत जास्त विकासकामे तालुक्यासाठी करावयाची असून, कोंडगावमधील राहिलेला खड्डेमय रस्ता लवकरच खड्डे भरून जनतेच्या समस्या दूर करणार असल्याचे सूतोवाच सभापती जयसिंग माने यांनी केले. कोंडगावचे सरपंच बापू शेट्ये यांची दूरदृष्टी वाखाणण्याजोगी असल्याचे उद्गार माने यांनी यावेळी काढले. यावेळी सभापती जयसिंग माने, सरपंच बापू शेट्ये, उपसरपंच प्रवीण जोयशी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष संजय गांधी, आशा व अंगणवाडीसेविका, डॉक्टर, पोलीसपाटील मारुती शिंदे, माजी महिला बालकल्याण सभापती रजनी चिंगळे, ग्रामस्थ उपस्थित होते.