कबड्डीपटू विशाल माने गणेशाेत्सवासाठी गावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:37 IST2021-09-17T04:37:16+5:302021-09-17T04:37:16+5:30

लांजा : भारताचा आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू आणि प्रो कबड्डी लीगचा स्टार डिफेंडर विशाल माने गणेशोत्सवासाठी लांजा तालुक्यातील वाकेड येथे आपल्या ...

Kabaddi player Vishal Mane in the village for Ganesha festival | कबड्डीपटू विशाल माने गणेशाेत्सवासाठी गावी

कबड्डीपटू विशाल माने गणेशाेत्सवासाठी गावी

लांजा :

भारताचा आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू आणि प्रो कबड्डी लीगचा स्टार डिफेंडर विशाल माने गणेशोत्सवासाठी लांजा तालुक्यातील वाकेड येथे आपल्या गावी आला हाेता. गणेशाेत्सवासाठी त्याने हजेरी लावल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण हाेते. ग्रामस्थांनी त्याचे जंगी स्वागत केले.

कबड्डीपटू विशाल माने हा लांजा तालुक्यातील वाकेड-मानेवाडी या गावचा मूळ रहिवासी आहे. ताे आपल्या कामधंद्यानिमित्त मुंबईला राहतो. यावर्षी तो गणपती सणानिमित्त आपल्या मूळ गावी आला होता. सध्या तो बेंगाॅल वाॅरिअर्समधून खेळत आहे. ग्रामस्थांनी विशाल वाकेड याचे जंगी स्वागत केले. तसेच श्री गणेश मंडळ आणि वरचीवाडी यांनी संयुक्तिकपणे त्याच्या घरी जाऊन त्याचा विशेष सत्कार केला. यावेळी दिनेश शेट्ये, योगेश शेट्ये, अरुण वाडेकर, सचिन माने, चिन्मय शेट्ये उपस्थित हाेते.

Web Title: Kabaddi player Vishal Mane in the village for Ganesha festival