शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : कोयना आणि कोळकेवाडी धरणात सर्व प्रकल्पग्रस्त घेणार उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 16:03 IST

कोयना प्रकल्पग्रस्तांना महानिर्मिती कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेऊ नये, अशी लेखी सूचना नसतानाही महानिर्मिती कंपनी कोयना प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेण्यास विरोध करीत असल्याने कोयना प्रकल्पग्रस्तांनी कोयना व कोळकेवाडी धरणामध्ये उडी घेण्याचा इशारा महानिर्मिती कंपनीला दिला आहे.

ठळक मुद्देमहानिर्मिती कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेऊ नये लेखी सूचना नसतानाही सामावून घेण्यास विरोध कोयना व कोळकेवाडी प्रकल्पग्रस्तांचा इशारा

चिपळूण : कोयना प्रकल्पग्रस्तांना महानिर्मिती कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेऊ नये, अशी लेखी सूचना नसतानाही महानिर्मिती कंपनी कोयना प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेण्यास विरोध करीत असल्याने कोयना प्रकल्पग्रस्तांनी कोयना व कोळकेवाडी धरणामध्ये उडी घेण्याचा इशारा महानिर्मिती कंपनीला दिला आहे.कोयना धरणाची उभारणी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून झाली आहे आणि याच धरणाच्या जलाशय साठ्यावर २००० एमडब्ल्यू वीजनिर्मिती करणारी कंपनी हे आमचे प्रकल्पग्रस्त नाहीत, असे स्पष्ट करीत असेल तर हे कोयना प्रकल्पग्रस्तांचे दुर्दैवच म्हणावे लागेल, असे सांगताना नंदकुमार सुर्वे म्हणाले की, महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असताना केवळ स्वार्थापोटी कार्यकारी संचालक विनोद बोंद्रे सर्वांची दिशाभूल करीत आहेत.

कलम ४ (१)च्या नोटीसची निर्मिती कशी होते, याची अक्कल नसणारे महानिर्मिती कंपनीचे अधिकारी कोयना प्रकल्पग्रस्तांकडे कलम ४ (१)ची नोटीस मागत आहेत. महानिर्मिती कंपनीचे अधिकारी सर्वांची दिशाभूल करीत आहेत. कारण जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरुपामध्ये कळवतात की, कोयना प्रकल्पाची व्याप्ती आहे.

कोयना प्रकल्पग्रस्तांना महानिर्मिती कंपनीमध्ये सामावून घेण्यासाठी प्रशासकीय अडचणी निर्माण होत आहे, तर दुसऱ्या बाजूला हेच अधिकारी वरिष्ठांना कळवितात की, कोयना प्रकल्पग्रस्तांकडे महानिर्मितीने संपादित केलेल्या मालमत्तेचे पुरावे नसल्याने ते आपले प्रकल्पग्रस्त नाहीत, ही अंदाधुंदी आम्ही सहन करणार नाही, असे सुर्वे यांनी सांगितले.कोयना प्रकल्पग्रस्त तरुण २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी महानिर्मिती कंपनी, पोफळी या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसले होते. २९ रोजी सायंकाळी कार्यकारी संचालक विनोद बोंद्रे यांनी पत्र दिले की, कोयना प्रकल्पग्रस्त, जलसंपदामंत्री व ऊर्जामंत्री यांच्यासमवेत तत्काळ बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. परंतु, आता अनेक दिवस उलटून गेले तरी बैठकीची तारीख नक्की होत नसेल तर टोकाची भूमिका घ्यावीच लागेल, असे मत डॉ. संजय सुर्वे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKoyana Damकोयना धरणmahavitaranमहावितरण