रोख रक्कमेसहीत दागिने लंपास

By Admin | Updated: March 9, 2017 18:11 IST2017-03-09T18:11:49+5:302017-03-09T18:11:49+5:30

संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Jewelry lamps with cash amount | रोख रक्कमेसहीत दागिने लंपास

रोख रक्कमेसहीत दागिने लंपास

रोख रक्कमेसहीत दागिने लंपास
संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
रत्नागिरी : बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्समधील रोख रकमेसह सुमारे ३८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वाती सुधाकर तटकरे (३८, चिखली - रांगववाडी) ८ मार्च रोजी सकाळी दीपक धाकटू पवार याच्या गावी जाण्यासाठी निघाल्या होत्या. स्वाती सकाळी १०.३० वाजता संगमेश्वरहून देवरूखला जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना चोरट्याने स्वाती यांच्या पर्सची चेन उघडून आतील १२ हजार रोख रक्कम व २६ हजार ६५० रुपयांचे दागिने असा ३८ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
ही बाब लक्षात येताच तटकरे यांनी संगमेश्वर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार संगमेश्वर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. (वार्ताहर)

Web Title: Jewelry lamps with cash amount