जेसीआयतर्फे सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:32 IST2021-04-01T04:32:17+5:302021-04-01T04:32:17+5:30

दापोली : येथील जेसीआयतर्फे नगरपंचायतमधील सफाई कर्मचाऱ्यांचा सॅल्युट द सायलेंट वर्कर्स या अंतर्गत सन्मान करण्यात आला. कोरोनाकाळामध्ये ...

JCI honors cleaners | जेसीआयतर्फे सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान

जेसीआयतर्फे सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान

दापोली : येथील जेसीआयतर्फे नगरपंचायतमधील सफाई कर्मचाऱ्यांचा सॅल्युट द सायलेंट वर्कर्स या अंतर्गत सन्मान करण्यात आला.

कोरोनाकाळामध्ये कोविडयोद्ध्ये म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावून दापोली शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी व शहराची स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारांचा सन्मान होणे हे उचित होते. यावेळी दापोली नगरपंचायतमधील तब्बल ३६ कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या सन्मानानंतर आमच्या कामाची दखल घेऊन जेसीआय संस्थेने आम्हाला सन्मानित केल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी नगराध्यक्षा परवीन शेख यांनी जेसीआय संस्थेचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमासाठी नगरसेविका डॉ. शबनम मुकादम, जया साळवी, स्वच्छता निरीक्षक संदीप जाधव, जेसीआय दापोलीचे अध्यक्ष कुणाल मंडलिक, आशिष अमृते, डॉ. सुयोग भागवत, भूषण इस्वलकर, रित्विक बापट, अतुल गोंदकर, फराज रखांगे, मयूरेश शेठ, प्रसाद दाभोळे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मुख्याधिकारी महादेव रोडगे यांचे विशेष सहकार्य लाभले.

....................

फोटो आहे.

Web Title: JCI honors cleaners